असं म्हणतात की मनुष्याला आनंदी राहण्याचे एक ना अनेक मार्ग असतात पण जो मनुष्य दुसऱ्याला आनंदी करण्याकरीता आपली दुःख बाजूला सारून दुसऱ्याचा आनंद हाच आपला आनंद मानतो …ह्यालाच तर… माणसातली माणुसकी ….म्हणतात आणि ह्याच माणुसकीचं हृदयस्पर्शी दर्शन घडविले ते आज … केअर ऑफ़ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक … श्री राजू मुंबईकर साहेब..आणि …सामाजिक कार्यकर्त्या … सौ.संगिता ताई ढेरे मॅडम… यांच्या औदार्यातून …आज पुन्हा एकदा… नवीन पनवेल नेरे …भानघर येथील करूणेश्वर वृद्धाश्रमातील …त्या आपल्या जीवा- भावाच्या नात्यांच्यां माणसांपासून दूर असणाऱ्या निरागस वृद्ध ……माय-बापांकरिता एक आनंदाचा क्षण निर्माण व्हावा !… आणि …त्यांच्या मनात आपलेपणाची ओढ निर्माण व्हावी !…म्हणून …त्यांच्या भेटीचं औचित्य साधत …त्यांच्या करिता … श्री राजू मुंबईकर साहेब…आणि …सौ.संगिता ताई ढेरे मॅडम यांच्या औदार्यातून … एका नामांकित कंपनीच्या ….. रिअल फ्रेश फ्रुट ज्यूसच्यां पाकिटांचे…आणि …खाऊंचं वाटप करण्यात आले.
ह्या आजी- आजोबांना भेटून त्यांना गोड – धोड वाटपाचा हृदयस्पर्शी कार्यक्रम ज्या नेरे विभागात साकार होणार होता… आणि …त्याच विभागात ज्यांच्या काही पिढ्यांच्यां नावांचा इतिहास हा सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेणारा परिवार म्हणून ज्याचं नावं!… त्या संपूर्ण विभागात आवर्जून घेतलं जातोय! अश्या …भोपी …परिवारातील एक युवा तरुण नेतृत्व … ज्यांची नाळ ही सदैव सामाजिक कार्याशी जुळलेली आहे ! …असे… रिटघर गावचे …माजी सरपंच…आणि …सामाजिक कार्यकर्ते… सन्माननीय …श्री भारत दादा सुभाषशेठ भोपी साहेब (महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष :- आगरी,कोळी,कराडी संघर्ष सा.संस्था )… यांनी …ह्या कार्यक्रमा करिता आज आपल्या व्यस्त कार्यक्रमातुन वेळात वेळ काढत …फक्त आणि फक्त ह्या… सामाजिक कार्याच्या माध्यमातून …एकमेकांची भेट व्हावी !…ओळख निर्माण व्हावी !!…ह्याच …आपुलकीनं … श्री राजू मुंबईकर साहेबांच्यां विनंतीला मान देऊन खास आपली उपस्थिती दर्शविली. करूणेश्वर वृद्धाश्रमात ह्या गोड भेटींच्यां कार्यक्रमात त्या आजी- आजोबांच्यां हातात … यांनी जेव्हा त्या फ्रेश फ्रुट ज्यूसची पाकिटं आणि … गोड खाऊं…दिला तो क्षण त्या माय -बापांकरिता आपलेपणाने मंतरलेल्या स्वर्गीय सुखाचा आनंद देणाराच होता!…हा त्यांच्या चेहऱ्यावरचा तो ओसंडून वाहणारा आनंद सांगून जात होता !…कार्यक्रमा दरम्यान प्रथमतः सर्वांचे स्वागत केलं ते … करूणेश्वर वृद्धाश्रमच्या…. सौ.करुणा जी मॅडम यांनी तर आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार प्रदर्शित केले ते … कुष्ठरोग निवारण समितीचे … श्री नीलकंठ जी कोळी साहेब….आणि …श्री संतोष जी ढोरे साहेब
. सोबतच ह्या कार्यक्रमा करीता मदतरुपी सहकार्य केलं ते …मित्र परिवारातील …श्री नवनीत पाटील (अध्यक्ष :- गोल्डन ज्युबली मंडळ सारडे ),… श्री अनिल घरत ( उरण तालुका सचिव :- आगरी,कोळी,कराडी संघर्ष सा.संस्था महाराष्ट्र राज्य ),… श्री संपेश पाटील (उपाध्यक्ष – सारडे विकास मंच), … श्री रोशन पाटील (खजिनदार – सारडे विकास मंच)…श्री क्रांती म्हात्रे, श्री मिलन पाटील,… वृद्धाश्रमातील …श्री नीलकंठ जी कोळी, श्री. संतोष जी ढोरे,सौ.करुणा मॅडम, श्री ईश्वर दादा…आणि वृद्धाश्रमातील सर्व आजी -आजोबांच्या आणि सहकारी कर्मचारी वर्गाच्या उपस्थितीत हा सुंदर आणि आनंददायी कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.
Leave a Reply