जालना (प्रतिनिधी) : जालना जिल्ह्यात रक्ताचा तुटवटा असल्याचे आणि रक्तदान करण्याचे आवाहन जिल्हा रुग्णालयाकडून करण्यात आले होते. सदरील रक्तदान करण्याचे आवाहन वृत्तपत्राच्या माध्यमातुन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद रिबेल फ्रेंड्स क्लब जालनाच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन रक्तदान केले.
राज्यभरात रक्ताचा तुटवडा भासत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसिध्दी माध्यमातुन बोलतांना सांगीतले होते तर जिल्हा रुग्णालय जालना यांच्या वतीने जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा भासत असल्याचे वृत्त प्रसारीत करण्यात आले होते. या वृत्तानुसार तसेच शासनाकडून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत तरुणांना संघटीत करुन रिबेल फे्रंड्स ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष किरण साळवे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन रक्तादान केले. यावेळी रिबेल फ्रेंन्डस क्लबचे अध्यक्ष किरण साळवे, कृष्णा हिवाळे, आकाश अर्सुड, शुभदान उघडे, प्रमोद कांबळे, शेख शकील भाई, राहूल पगारे, गणेश बिल्लोरे, पवन मुंढे, गोलू दाभाडे, नंदू पाटोळे व आदी जणांनी रक्तदान केले.
Leave a Reply