ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

त्या घटनेप्रकरणी विद्रोही पॅंथरची स्वातंत्र्यदिनी निदर्शने

August 17, 202114:40 PM 9 0 0

जालना ( प्रतिनिधी) : घनसावंगी तालुक्यातील अनिकेत घुगे या दलित तरुणाच्या मारेकऱ्यांची नार्को टेस्ट करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी विद्रोही पॅंथर सामाजिक संघटनेच्या वतीने स्वातंत्र्यदिनी जिल्हा कचेरीसमोर निदर्शने करण्यात आली.

अनिकेत घुगे या तरुणाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार गेल्या पंधरवड्यात उघडकीस आला. पोलीसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची नार्को टेस्ट करून फाशीची शिक्षा द्यावी, या प्रमुख मागणीसाठी विद्रोही पॅंथरचे संस्थापक अध्यक्ष कपिल खरात , संस्थापक सचिव संदीप साबळे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यदिनी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत आरोपींना फाशी द्या अशी घोषणाबाजी केली . झेंडावंदनानंतर पालकमंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. आंदोलनात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कपिल खरात ,सचिव संदीप साबळे, महाराष्ट्र प्रवक्ते राहुल उघडे ,मराठवाडा अध्यक्ष भास्कर बोर्डे,मराठवाडा उपाध्यक्ष राहुल खरात, जिल्हाध्यक्ष गौतम चित्तेकर ,संदीप राठोड ,जिल्हा उपाध्यक्ष लाला चौधरी, सिकंदर खान, महेंद्र वाघमारे, आकाश जाधव, रवि जाधव, विशाल तेझाड ,माधव जाधव ,किरण गंगातीवरे ,अजय सुतार ,योगेश पैठणे, आकाश पारवे, लखन चित्तेकर ,जीवन दांडगे, ऋषिकेश मोरे, आकाश लहाने, सागर गायकवाड ,गोपी सिंग कलानी, चंद्रकांत गायकवाड, श्याम नवगिरे , गौतम तुपे, योगेश बोर्डे , महेंद्र नवगिरे, राजू शेळके, विजय कुलकर्णी, प्रवीण भिंगारे, गणेश डहाळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *