ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जालना जिल्ह्यासाठी कोव्हॅक्सीनचे 8 हजार 500 डोस प्राप्त

June 9, 202112:42 PM 30 0 0

जालना :- जालना जिल्ह्यासाठी कोव्हॅक्सीनचे लसीचे 8 हजार 500 डोसेस प्राप्त झाले असुन यामधुन जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालय व जिल्हा स्त्री रुग्णालय जालना यांना वाटप करण्यात येत आहे. 18 ते 44 वयोगटातील हेल्थ केअर वर्कर व फ्रंट लेवल वर्कर यांचा दुसरा डोस दि. 5 जुन 2021 पासुन देण्यात येत असुन त्यासाठी त्यांना लसीकरण केंद्रावर ओळख पत्र दाखवुन जिल्ह्यातील नियोजित सर्व सत्रात लस मिळेल.

https://indianfast.com/

https://indianfast.com/

लसीपासुन वंचीत असलेले 45 वर्ष व अधिक वयोगाटातील सर्व नागरिकांना लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन लसीकरण करुन घेणे असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरुन इतर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना लस दिली जाणार नाही.

18 ते 44 वयोगटातील नागरिकांनी लसीकरण केंद्रावर येऊ नये. लस घेतल्यानंतर लाभार्थ्यांनी खालील त्रिसुत्रीचा वापर करावा मास्कचा नियमित वापर करावा, सॅनिटायझर नियमित वापरावे, हात नियमित धुण्यात यावे.

तसेच लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांनी लसीकरण केंद्रावर सामाजिक अंतराचे पालन करण्याबरोबरच गर्दी न करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी, जालना यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *