ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जालना तालुक्यातील माणेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री अरुण देशमुख यांचा सत्कार

October 3, 202112:53 PM 3 0 0

जालना(अनिता पवार) नवोदय प्रवेश परीक्षा केंद्र माणेगाव खा अंतर्गत 3 शाळेतील 4 विद्यार्थी नवोदय प्रवेश परीक्षेत निवड झाल्याबद्दल व NMMS परीक्षेत 2 विध्यर्थी शिष्यवृत्ती साठी पात्र झाल्याबद्दल केंद्रप्रमुख या नात्याने आज तालुका स्तरीय शाळा पूर्व तयारी बैठकीत पंचायत समिती जालनाचे गटशिक्षणाधिकारी श्री भरत वानखेडे साहेबांनी केंद्रप्रमुख श्री अरुण देशमुख यांचा सत्कार करून अभिनंदन केले.
यावेळी विस्तार अधिकारी श्री सोळुंके साहेब वाघरुळ बिट च्या विस्तार अधिकारी श्रीमती गीता नाकाडे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.


माझा सत्कार हा प्रातिनिधिक स्वरूपाचा असून यासत्काराचे खरे मानकरी या विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन करणारे माणेगाव शाळेचे मुख्याध्यापक श्री संदीप कुलकर्णी सर, वर्गशिक्षक श्री संतोष नागवडे,सर श्रीमती मंजुषा मोरे मॅडम,पारेगाव शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय चौधरी सर, श्री अनंत जोशी सर, श्री मदन गिरी सर,श्री आप्पासाहेब मुळे सर, यशवंती इंग्लिश स्कूल माणेगाव चे मुख्याध्यापक श्री पडूळ सर व त्यांचा स्टाफ व नेत्रदीप विद्यालय मोतीगव्हान चे मुख्याध्यापक श्री परिहार सर व श्री आखरे सर व त्यांचा स्टाफ हे आहेत असे अरुण देशमुख म्हणाले.त्यांनी सर्व नाम्मोलेखित शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *