जालना ( प्रतिनिधी) : स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र स्विमिंग असोसिएशन ने जालना जिल्हा जलतरण असोसिएशनला अधिकृत मान्यता दिली आहे .अशी माहिती जालना जिल्हा स्विमिंग असोसिएशन चे अध्यक्ष राजेश राऊत यांनी आज दिली. महाराष्ट्र स्विमिंग असोसिएशनच्या राज्य कार्यकारिणीची बैठक शनिवारी ( ता.२०) ठाणे येथील एका हॉटेलमध्ये संपन्न झाली.महाराष्ट्र शाखेचे पदाधिकारी जयप्रकाश दुबळे, जुबीन अमारिया, संभाजी भोसले, निता तळवळकर, अभय देशमुख यांच्या सह या बैठकीत राज्यभरातून विविध जिल्ह्यांतील स्विमिंग असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
मागील दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या जालना जिल्हा स्विमिंग असोसिएशनने शालेय तसेच जिल्हास्तरावर कुमार,किशोर आणि खुल्या गटांत स्पर्धा घेऊन जलतरण क्षेत्रात आपले कार्य सातत्याने सुरू ठेवले आहे. राज्य असोसिएशनची मान्यता मिळावी यासाठी जालना जिल्हा स्विमींग असोसिएशनचे अध्यक्ष राजेश राऊत व सचिव संजय देठे यांनी राज्याकडे मागणी केली होती. कार्य अहवाल ही सादर केला.
राज्य कार्यकारिणी ने जालना जिल्हा स्विमिंग असोसिएशनच्या कार्याचे अवलोकन करून विचार विनिमय याने आज झालेल्या बैठकीत अधिकृत मान्यता प्रदान करत तसे लेखी पञ दिले.
केंद्रीय आणि राज्य असोसिएशन ने दिलेल्या नियम व अटींशी बांधील राहून जलतरण क्षेत्रात उपक्रम राबवावेत. असे मान्यता पञात नमूद करण्यात आले असून अधिकृत मान्यता मिळाल्याने जलतरण पटूंमध्ये उत्साह संचारला आहे.
Leave a Reply