ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

दीन- दुबळ्यांची गरज ओळखूनच उपक्रम-विजय चौधरी वडीलांच्या वर्षश्राध्दानिमित्त आपुलकी बेघर निवारा केंद्रातील रहिवाशांना भोजनदान

October 2, 202115:01 PM 4 0 0

जालना : दीन- दुबळ्यांची खरी गरज असते ती एकवेळच्या जेवणाची! ही गरज ओळखूनच आपण हा उपक्रम राबवत असल्याचे नगरसेवक विजय चौधरी यांनी म्हटले आहे. जालना शहरातील आपुलकी बेघर निवारा केंद्रात स्थायिक असलेल्यांना श्री. चौधरी यांनी त्यांच्या वडीलांच्या वर्षश्राध्दानिमित्त एकवेळचे अन्नदान केले. त्याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना श्री. चौधरी बोलत होते. यावेळी कैलास ब्रिगेडचे अध्यक्ष अरुण सरदार यांची प्रमुख उपस्थिती होती.


श्री. सरदार म्हणाले की, आ. कैलास गोरंट्याल यांच्या प्रेरणादायी विचारातूनच आजचा हा भोजनदानचा कार्यक्रम होत आहे. नगरसेवक श्री विजय चौधरी यांनी हा उपक्रम राबवून खर्‍याअर्थाने गोरगरीबांची सेवा केली आहे. अशाच प्रकारे दानशूरांनी देखील भोजनदानाचा कार्यक्रम घेऊन गोरगरीबांच्या जेवणाची व्यवस्था केली पाहिजे,अशी अपेक्षा श्री. सरदार यांनी व्यक्त केली. यावेळी अयोध्याबाई चौधरी, रेखाबाई चौधरी, सविताबाई चौधरी, नरेश चौधरी, सुजित चौधरी, धनंजय चौधरी, हार्दिक चौधरी आदींची उपस्थिती होती. प्रारंभी स्व.श्री. शामलाल चौधरी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन श्रध्दांजली वाहण्यात आली. कार्यक्रमास आपुलकीतील स्थायिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *