ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जालना बाजार समितीत रेशीम कोषास विक्रमी 51 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव; शेतकरी आणि खरेदीदारांचा सत्कार

September 3, 202115:02 PM 157 0 2

जालना ( प्रतिनिधी) : जालना कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सुरू असलेल्या रेशीम मार्केटमध्ये गुरुवारी ( ता .02) रेशीम कोषास चालू हंगामातील सर्वात विक्रमी 51 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे.


जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री अर्जुनराव खोतकर यांनी मराठवाड्या सोबतच विदर्भ, खानदेश आणि अहमदनगर जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रात सर्वप्रथम जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात 21 एप्रिल 2018 रोजी स्वतंत्र रेशीम कोष मार्केट कार्यान्वित केली. या बाजारपेठेमुळे कर्नाटक राज्यातील रामनगर येथे रेशीम कोष विक्रीस घेऊन जाण्याचा मोठा खर्चाच्या बोजातून शेतकरी शेतकऱ्यांना मुक्ती मिळाली.
तेव्हा पासून प्रत्येक हंगामात शेतकरी या बाजारपेठेत रेशीम कोष विक्रीसाठी आणत आहेत. चालू आर्थिक वर्षात 1 एप्रिल ते आजपर्यंत 1471 शेतकऱ्यांनी 139 टन रेशीम कोष विक्री केली असून 4 कोटी 97 लाख रुपये एवढी रक्कम रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना प्राप्त झाली आहे.
गतवर्षी ऑगस्ट अखेर 210 रू. प्रतीकिलो दर होता. यंदा हंगामाच्या सुरुवाती पासून सरासरी 365 रूपये प्रती किलो भाव मिळत आहे.
तर आज धामणगाव ता. फुलंब्री जि. औरंगाबाद येथील शेतकरी सोमीनाथ कणसे यांच्या कोषास देशातील क्रमांक 1 ची बाजार पेठ असलेल्या रामनगर ( कर्नाटक) च्या तोडीस विक्रमी असा 51 हजार रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला. त्यांच्या सह खरेदी दार इम्रान पठाण यांचा जालना कृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे बाजार समितीचे संचालक विष्णू चंद ,सचिव रजनीकांत इंगळे, रेशीम अधिकारी अजय मोहिते, यांनी सत्कार केला. या वेळी बाजार समितीचे मोहन राठोड, अशोक कोल्हे, राहुल तायडे, गजानन जऱ्हाड , किशोर गोल्डे, संजय छबीलवाड, प्रफुल्ल हिवरेकर, प्रसाद काकडे, हार्दिक फलके, संजय जाधव, विश्वंभर गिरी रेशीम कार्यालयाचे भरत जायभाये, गणेश कड यांच्यासह रेशीम कोष उत्पादक शेतकरी, खरेदीदार यांची उपस्थिती होती.
सोन्यासारखा दर मिळत असल्याचे समाधान : अर्जुनराव खोतकर
पारंपरिक पिकांसोबतच हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून रेशीम कोष लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल लक्षात घेता शेतकऱ्यांना जवळ बाजारपेठ उपलब्ध व्हावी या दृष्टीकोनातून आपण रेशीम खात्याचे मंत्री असल्याने जालना कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात रेशीम मार्केट कार्यान्वित केले.रेशीम उत्पादक शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद पाहता आज मितीस देशात रामनगर ( कर्नाटक) नंतर दुसऱ्या क्रमांकाची बाजार पेठ म्हणून नावारूपास येत आहे. या सोबतच सोन्याच्या तोडीचा भाव शेतकऱ्यांना मिळत असल्याने आपल्या प्रयत्नांचे फलित होत असल्याची भावना जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुनराव खोतकर यांनी व्यक्त केली. तथापि शेतकऱ्यांनी रेशीम कोष विक्रीसाठी आणावेत .असे आवाहनही श्री. खोतकर यांनी केले आहे.
रेशीम च्या मागणीत वाढ : अजय मोहिते
यंदा चीनमध्ये पूरग्रस्त परिस्थिती उद्भवल्याने तेथील रेशीमचे उत्पादन घटले तर भारतात झालेले अनलॉक यामुळे प्रक्रिया उद्योग सुरु झाल्यानंतर एकदमच रेशीम च्या मागणीत मोठी वाढ झाली . 100 अंडी कोषात शेतकरी सरासरी 80 ते 90 किलो उत्पादन घेत आहेत. रेशीम कोष हे शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत असल्याचे माहिती जिल्हा रेशीम अधिकारी अजय मोहिते यांनी दिली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *