ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

रिफाईंड ऑइल खायला हानिकारक आहे, मग कुठलं तेल खाण्यात वापरायचे आणि तेच का खायचं ?

August 5, 202120:24 PM 131 0 0

उरण प्रतिंनिधी (संगीता सचिन ढेरे)

कोल्ड कम्प्रेस्ड ऑइल म्हणजेच लाकडी घाण्याचे तेल. जुन्या पद्धतीत तेल काढण्याची पद्धत म्हणजे लाकडी घान्यावरील तेल

 

लाकडी घाण्याच्या शुद्ध तेलाचे फायदे !

 

१. लाकडी घाण्याचे शुद्ध तेल कोणत्याही प्रकारचे केमिकल्स न वापरता पूर्णपणे नैसर्गिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने तयार केले जाते .

 

२. शुद्ध तेलाचा सुगंध येतो कारण त्यात चार ते पाच प्रकारचे प्रोटिन्स असतात . तो सुगंध त्या प्रोटिन्सचाच असतो .

 

३. शुद्ध तेलाला चिकटपणा खूप असतो कारण त्यामध्ये आपल्या शरीराला आवश्यक असणारे फॅटी ऍसिड असतात व व्हिटॅमिन इ आणि मिनरल्स सुद्धा असतात.

४. लाकडी घाण्यावरचे तेल सर्वोत्तम असते कारण हे तेल काढताना लाकडी घाणा असल्यामुळे शेंगदाण्यावर जास्त दाब दिला जात नाही. शिवाय हा घाणा एक मिनिटात फक्त १४ वेळाच फिरतो . थोडक्यात या लाकडी घाण्याचा RPM १४ असतो . त्यामुळे लाकडी घाण्याचे तेल काढताना एकही नैसर्गिक घटक नष्ट होत नाही .

 

५. शरीराला अत्यंत आवश्यक असलेला घटक हायडेन्सिटी लिपोप्रोटीन (H.D.L) हा आपल्या लिव्हरमध्ये तयार होतो मात्र तो शुद्ध तेल खाल्ल्यामुळे तयार होतो . म्हणूनच आहारात शुद्ध तेल आवश्यक असावे .

 

६. शुद्ध तेल खाल्ल्याने वात दोष संतुलित राहतो त्यामुळे वाताच्या प्रकोपाने होणारे आजार होत नाही .

 

७. हार्ट अटॅक, किडनीचे आजार, कॅन्सर, डायबेटिज, सांधेदुखी, पॅरालिसिस, ब्रेन डॅमेज यांसारख्या गंभीर आजारांवर शुद्ध तेल गुणकारी आहे.

 

८. भारतात शेकडो वर्षांपासून लाकडी घाण्याचे तेल आहारात असल्याने आपले पूर्वज दीर्घायुषी होते. १०० वर्षांच्या व्यक्तीला सुद्धा गंभीर आजार नव्हते.

 

९. लाकडी घाण्यावर तेल तयार करताना तेलाचे तापमान ४० ते ४५ सेल्सिअसपेक्षा जास्त नसते त्यामुळे तेलातील कोणताही नैसर्गिक घटक नष्ट होत नाही . हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी महत्वाचे असतात .

 

१०. चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे, आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवणारे लाकडी घाण्याचेच शुद्ध तेल खावे. तसंच एक मोठा गैरसमज आपल्या सगळ्यांमध्ये आहे की, शेंगदाण्याच्या तेलाने कोलेस्ट्रॉल वाढते हे चुकीचे आहे . उलट शेंगदाण्याच्या तेलामुळे H.D.L. वाढते आणि हेच H.D.L. आपल्या शरीरात अत्यंत आवश्यक असते .

 

शेंगदाणा, करडई, सूर्यफूल, तीळ, जवस, मोहरी, खोबरेल, खुरसणी, अक्रोड, बदाम ह्यांचे लाकडी घाण्याचे तेल मार्केट मध्ये उपलब्ध आहे. *परंतु ते अशुद्ध व भेसळ केले नाही याची खात्री घ्यावी.

Categories: आरोग्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *