जालना (प्रतिनिधी) ः अखिल भारतीय कॉग्रेस कमिटीच्या वतीने पक्ष सदस्य नोंदणी करण्या संदर्भात प्रदेश काँग्रेसला आदेशीत करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने जालना जिल्हयात दि. 1 नोव्हेंबर रोजी पक्ष सदस्य नोंदणीचा शुभारंभ दुपारी 2 वाजता करण्यात येणार आहे.
जिल्हयातील तालुका पदाधिकार्यांनी यादिवशी नोंदणीचा कार्यक्रम हाती घ्यावा असे आवाहन जालना जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी केले आहे. प्रदेश कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले हे गडचिरोली जिल्हातून पक्ष नोंदणीच्या सदस्य नोंदणीची सुरुवात करणार आहे. जालना जिल्हयातील तालुका व शहर कॉग्रेस कमेटीच्या पदाधिकान्यांनी आपल्या स्तरावर पक्ष सदस्य नोंदणी करावी, असे आवाहन प्रदेश कॉग्रेसचे उपाध्यक्ष आ. कैलास गोरंट्याल, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, आ.राजेश राठोड , माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, जिल्हाकार्याध्यक्ष राजेंद्र राख यांनी केले आहे.
Leave a Reply