जालना (प्रतिनिधी) ः करोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेली कोव्हीड लसीकरणाची मोहिम ऑनलाईन एैवजी ऑफलाईन पध्दतीने राबविण्यात यावी अशी मागणी भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा न.प. गटनेते अशोक पांगारकर यांनी केली आहे.
या संदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात पांगारकर यांनी म्हणटले आहे की, महाराष्ट्र राज्यासह देशात करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लसीकरण मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मध्यंतरी राज्यात आणि जालना जिल्ह्यात लसीचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे राज्य शासनाने लसीकरणासाठी ऑनलाईनचा फंडा समोर करुन वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला. ऑनलाईन पध्दतीने लसीकरण मोहिम राबविण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेक लाभार्थी लसीकरणा पासुन वंचित राहिले आहेत. ऑनलाईन करतांना अनेक तांत्रीक अडचणी निर्माण झाल्यामुळे जालना शहर व जिल्ह्यातील हजारो लोक लसीकरणापासुन वंचित राहिले असून त्यांना लसीचा पहिला डोस मिळाला अशा व्यक्तींना दुसरा डोस घेण्यासाठी विविध केंद्रावर भटकंती करावी लागत आहे. तसेच जे प्रथम डोस घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत अशा व्यक्तींना ऑनलाईन करतांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. सध्या जालना जिल्ह्यात कोव्हीशिल्ड आणि कोव्हक्सिंन लसीचा साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला आहे. त्यामुळे लसीकरण मोहिम राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडुन घालण्यात आलेली ऑनलाईनची अट शिथील करुन ऑफलाईन पध्दतीने राबवुन सर्व सामान्य नागरिकांना होणारा त्रास दुर करावा अशी मागणी अशोक पांगारकार यांनी या पत्रकात केली आहे.
Leave a Reply