नांदेड :(रूचिरा बेटकर) प्रतिनिधी- रोजगार हमी योजनेअंतर्गत गोरगरीब महिलांना व्यवसायाच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी राधा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या अंतर्गत प्रियंका ब्युटी पार्लर येथे सौंदर्य शास्त्राचे प्रशिक्षण देऊन महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम बनवले जाते त्यासाठी सौ.सरस्वती ताई कांबळे (सरू ताई) या अहोरात्र त्यासाठी प्रयत्न करत असतात.
त्यांच्याकडे आज वर्षावसाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला ऐंगडेताई, वाघमारे ताई, माने ताई अशा बऱ्याच महिलाच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात ऐंगडेताई यांनी स्वतःचा जीवन प्रवास सांगून मुलाला कठिण परिस्थिती शिकवून ऑस्ट्रेलिया ला पाठवून, त्यांचा मुलगा आज भारत देशासाठी काय कामगिरी करत आहे. त्याबद्दल सर्वांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.याच बरोबर अष्टभुजा हिरकणी साप्ताहिक यांचे जोरदार विमोचन त्यांच्या हस्ते करण्यात आले
शेवटी खीरदानचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Leave a Reply