जालना ( प्रतिनिधी) : नगर पालिकेच्या वतीने शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असून दोन दिवसांपूर्वी गांधी चमन परिसरातील अतिक्रमणे हटविल्या नंतर आज जूना जालना भागातील शनि मंदिर ते उड्डाण पुल रस्त्यावर असलेली अतिक्रमणे नगर पालिकेच्या वतीने शुक्रवारी ( ता. ०५) पोलीस बंदोबस्तात काढण्यात आली.
अमृतेश्वर मंदिरा लगत असलेल्या बारवेच्या दोन्ही बाजूंनी मुख्य रस्त्यावर चहा, पान टपऱ्या, व फेरीवाले यांनी दुकाने थाटली आहेत. जिल्हाधिकारी यांनी शहरातील अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने आज मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंता संजय वाघमारे, स्वच्छता विभाग प्रमुख राजू मोरे, यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता निरिक्षक सॅमसन कसबे, पंडित पवार,रवींद्र कल्याणी,अरूण वानखेडे यांनी कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन व पोलीस बंदोबस्तात दुपारी १२ वाजता अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांच्या सूचनेनुसार अन्य ठिकाणी असलेल्या
अतिक्रमण धारकांना सूचना देण्यात आल्या असून या पुढे ही अतिक्रमणांविरूध्द मोहीम सुरू राहील.असे स्वच्छता निरिक्षक सॅमसन कसबे यांनी सांगितले. एक जेसीबी, ट्रॅक्टर च्या सहाय्याने ही अतिक्रमणे हटवली . मोहिमेत दफेदार शोएब खान, श्रावण सराटे, जवान दिलीप हिवाळे, गणेश फुंदे, संतोष पाटोळे, स्वच्छता कर्मचारी दीपक हिवाळे, रवी कांबळे, सुभाष भाले, संजय धोञे, मोहन पांडव, लक्ष्मण कांबळे, सुनीता कांबळे, राधा कांबळे यांच्या सह कर्मचारी सहभागी झाले.
Leave a Reply