ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

गणेशोत्सवापूर्वी चिरनेर गावातील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती

September 7, 202113:19 PM 11 0 0

उरण (संगिता पवार ) चिरनेर गावातील अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम गणेशोत्सवा पुर्वी चिरनेर ग्रामपंचायतीने मे.पी.पी. खारपाटील कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून हाती घेतल्याने रहिवाशांनी तसेच चिरनेर गावात ये – जा करणाऱ्या पर्यटकांनी समाधान व्यक्त केले आहे.


रायगड जिल्ह्यातील निसर्गरम्य ठिकाण, ऐतिहासिक प्रसिद्ध गाव म्हणून चिरनेर गावाकडे पाहीले जाते.त्यात जागूत श्री महागणपती देवस्थान आणि गणेश मुर्ती कारागिरांचे माहेर घर अशी ही ओळख निर्माण झाल्याने हजारो पर्यटक, भाविक मंदिरात श्रीच्या दर्शनासाठी तसेच गणेशोत्सवासाठी शाडूच्या मातीच्या मूर्ती खरेदी करण्यासाठी गर्दी करत असतात.गावात ये- जा करणाऱ्या नागरिकांचा, भाविकांचा प्रवास हा सुखद व्हावा यासाठी चिरनेर ग्रामपंचायतीने मे.पी.पी.खारपाटील कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून गावातील महत्वाच्या अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.सदर रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम हे चिरनेर ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष चिर्लेकर, उद्योगपती राजाशेठ खारपाटील, समाजसेवक सचिन घबाडी यांच्या उपस्थितीत करण्यात आल्याने रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *