नांदेड (प्रतिनिधी)- छत्रपती चौक ते विश्रामगृहापर्यंतचे जीवघेणे खड्डे युद्धपातळीवर बुजवण्याबाबत कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड यांना नांदेड (जिल्हा)शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस रामनारायण बंग यांनी एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
छत्रपती चौक, मोर चौक,पावडेवाडी नाका ते विश्रामगृह पर्यंतच्या रस्त्यावर जीवघेणे प्रचंड खड्डे पडलेले असुन छोटे मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत.वर्कशॉप, श्रीनगर,तरोडा नाका येथे वाहतुक नेहमी जाम रहात असल्यामुळे छत्रपती चौक, मोर चौक, पावडेवाडी ते विश्रामगृहापर्यंत पर्यायी रस्ता म्हणून या रस्त्यावर वाहनांची वाहतुक प्रचंड प्रमाणात वाढली आहे.याच रस्त्यावर विनापरवाना असलेले गतिरोधक पण त्वरित काढुन टाकावे अन्यथा उच्च न्यायालयाने दिलेल्या मानकाप्रमाणे गतिरोधक तयार करावेत. या निवेदनाची एक प्रत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांना माहीतीस्तव रामनारायण बंग यांनी दिली आहे.
Leave a Reply