ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन सेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

June 23, 202210:56 AM 20 0 0

जालना (प्रतिनिधी) – दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे. तसेच शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या रक्कमेमध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे रिपब्लिकन सेनेच्या वतीने करण्यात आली. सदर मागण्या पुर्ण करण्यात याव्या यासाठी शहरातील अंबड चौफूली ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत दि. 28 जून रोजी सकाळी 12 वाजता जिल्हाध्यक्ष लिंबाजी वाहुळकर, पुर्व जिल्हाध्यक्ष दिनेश आदमाने यांच्या मार्गदर्शनाखाली धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रमाई व प्रधानमंत्री आवास योजनेचे जे 1 लाख 38 हजार रुपये मिळते. ते अत्यंत तुटपुंजे आहे. त्यात सर्वसामान्य माणसाला घर बांधता येत नाही. परिणामी, त्याला कर्ज काढावे लागते. त्यामुळे शासनाने ग्रामीण भागासाठी यात वाढ करुन 2 लाख 50 हजार रुपये तर शहरी भागासाठी 3 लाख रुपेय अनुदान द्यावे, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसाठी मिळणाऱ्या विहिरींना काही गावात भूजल सर्वेक्षण विभागाकडून पाणी पातळी कमी असल्याचे कारण पुढे करुन आडकाठी करण्यात येते. त्यामुळे मागासवर्गीयांच्या बागयतदार होण्याच्या स्वप्नाला तिलांजली देण्याचे काम हा विभाग करीत आहे. त्यामुळे ही अट रद्द करावी. गायरान जमिनी कसरणाऱ्या कास्तकऱ्यांच्या नावे सातबारा देण्यात याव्यात. बहुतांश गावात अनुसूचित जाती व बहुजणांची घरे आहेत त्यांना स्वतंत्र अशी स्मशानभुमी आहे परंतू त्यांची 7/12 वर नोंद नसल्याने अनेक ठिकाणी अंत्यसंस्काराच्या वेळेस वाद होतात त्यामुळे स्मशानभूमीची 7/12 नोंद करण्यात यावी. संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेची जाचक अटी रद्द करून लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा. अंबड तालुक्यामध्ये पानेगाव ते वाघलखेडा नकाशाप्रमाणे 33 फूटाचा रस्ता मोकळा करण्यात यावा. परतूर तालुक्यातील आष्टी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजिक सभागृहासाठी जागेचा नमुना नं. 8 देण्यात यावा. जिल्ह्यातील जुगार, मटका, दारू, रेती अवैध व्यवसाय तात्काळ बंद करण्यात यावे.

जालना तालुक्यातील धानोरा येथील मयत राजकुमार भास्कर साळवे याच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्यात यावी. जिल्हाधिकारी कार्यालयातील 10 ते 15 वर्षापासून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करण्यात यावी. नंदापूर फाटा ते नंदापूर गावात तसेच अहंकर देऊळगांव ते माळाचा गणपती नवीन रस्ता तात्काळ बनविण्यात यावा. चंदनझिऱ्यातील चंदनझिरा परिसरात जाण्याचा मुख्य रस्ता खराब झाला असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे तो रस्ता तात्काळ बनविण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार व प्रदेशाध्यक्ष सागर डबरासे यांच्या सूचनेनुसार धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याचे निवेदनाच्या शेवटी नमूद करण्यात आले आहे.

यावेळी चंद्रकांत खरात, मच्छिंद्र खरात, सर्जेराव अंभोरे, सुरेश वानखेडे, अरूण म्हस्के, दादाराव काकडे, शुभम हिवराळे, भिमराज खरात, नवनाथ ठोके, मधुकर म्हस्के, कैलास उघडे, जयपाल भालके, गोरख आपुट, गौतम पानवाले, कांताबाई बोरुडे, मथुराबाई मोरे, शोभाबाई म्हस्के, सुमनबाई खरात, शांताबाई हिवाळे, इंदुबाई लहाणे, डॉ. प्रिया जैन, संपत खाडे, किशोर साळवे, कुंडलिक वाहूळकर, शेख जब्बर, भदर्गे, ज्ञानदेव खरात, भाऊराव कोळे, संतोष उन्हाळे, कैलास भालके, नितिन भादरगे, अशोक पवार, गणेश हिवाळे, भगवान मघाडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *