जालना (प्रतिनिधी) केंद्र सरकारने पास केलेल्या कृषी कायद्याविरोधात आज संपुर्ण भारत शेतकर्यांकडून बंद ठेवण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर विविध संघटना, पक्षाकडून सुद्धा शेतकरी आंदोलनाला मोठे समर्थन मिळाले असून रिपब्लिकन सेनेच्या वतीने जालना शहरातील मामा चौक येथे निदर्शने करून केद्र शासनाचा जाहिर निषेध करण्यात आला.
यावेळी निदर्शना दरम्यान जिल्हाध्यक्ष लिंबाजी वाहुळकर यांनी केंद्र शासनाचा निषेध करत तात्काळ ते तीन काळे कायदे मागे घेण्यात यावे नसता रिपब्लिकन सेनेच्या वतीने यापुढेही मोठे आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला.
यावेळी रिपब्लिकन सेना जालना जिल्हाध्यक्ष लिंबाजी वाहुळकर, जिल्हा संपर्क प्रमुख दिनेश आदमाने, जिल्हा महासचिव एक्स आर्मी मेजर चंद्रकांत खरात, जिल्हा संघटक मच्छिंद्रआप्पा खरात, जिल्हा उपाध्यक्ष अरुण म्हस्के, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश वानखेडे, जिल्हा सहसंघटक भानुदास साळवे, जालना तालुका अध्यक्ष भिमराज खरात, जिल्हा सह सचिव नवनाथ ठोके, महिला जिल्हाध्यक्षा कमलताई जोगदंड, जिल्हा सचिव कांताताई बोर्डे, तालुका सचिव दगडु जाधव, दादाराव काकडे, देवानंद वानखेडे, अरुण खरात यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
Leave a Reply