ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

रिपब्लिकन सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदी दिनेश आदमाने पक्ष संघटन मजबुत करण्यावर भर देण्याची ग्वाही

March 12, 202115:55 PM 54 0 0

जालना प्रतिनिधी ः रिपब्लिकन सेनेच्या जालना जिल्हाध्यक्षपदी दिनेश आदमाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रिपब्लिकन सेनेचे संस्थापक आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सागर डबरासे यांच्या सुचनेनुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. लिंबाजी वाहुळकर यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित पुर्व जालना जिल्हाध्यक्ष दिनेश आदमाने यांचा जालना जिल्ह्यातील सर्व रिपब्लिकन सैनिकांनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हा महासचिव एक्स आर्मी चंद्रकांत खरात, जिल्हा संघटक मच्छिंद्र आप्पा खरात, जिल्हा उपाध्यक्ष अरुण म्हस्के, दादाराव काकडे, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश वानखेडे, जिल्हा सचिव नवनाथ ठोके, जिल्हा सहसचिव भानुदास साळवे, जिल्हा सहसंघटक बबन खरात, जालना तालुकाध्यक्ष भिमराज खरात, तालुका उपाध्यक्ष बबन खरात, शहर कार्याध्यक्ष सतार पटेल, पिरकल्याण सर्कल अध्यक्ष भिवाजी खरात, अर्जुन म्हस्के व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या बोलतांना दिनेश आदमाने म्हणाले की, रिपब्लिकन सेनेचे संघटन मजबुत करण्याबरोबरच कार्यकर्त्याचे जाळे निर्माण करण्यासाठी आगामी काळात जोमाने काम करणार असून सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्याना सोबत घेवून गाव येथे शाखा हा उपक्रम राबविणार असल्याची ग्वाही आदमाने यांनी यावेळी दिली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *