जालना ( प्रतिनिधी) : दरवर्षी वीज पडून अनेकांचा बळी जातो पावसाळ्यातील ही मोठी आपत्ती लक्षात घेता कोकण विभागा सोबतच संपूर्ण मराठवाड्यात वीज प्रती रोधक यंत्रणा कार्यान्वित करावी. अशी मागणी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य डॉ. संजय लाखे पाटील यांनी नुकत्याच झालेल्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत केली .त्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता देत मराठवाड्यात वीज प्रती रोधक यंत्रणा कार्यान्वीत करण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. अशी माहिती डॉ.संजय लाखे पाटील यांनी मंगळवारी ( ता. १३) दिली. मराठवाड्यात आपत्ती निवारणाच्या दृष्टीने अत्यंत हितकारक असलेल्या या प्रकल्पा विषयी अधिक माहिती देताना डॉ. संजय लाखे पाटील पुढे म्हणाले, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंञालयात प्राधिकरणाची बैठक झाली या वेळी मदत व पुर्नवसन मंञी विजय विड्डेटीवार,कृषी मंत्री दादा भुसे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खरगे,मदत व पुर्नवसन चे असिम गुप्ता,कृषी चे एकनाथ डवले,मुख्य सचिव सिताराम कुंटे, वित्त व नियोजन चे अतिरिक्त सचिव यांची उपस्थिती होती.
कोकण विभागात सर्वञ वीज प्रतीरोधक यंत्रणा बसवावी असा प्रस्ताव बैठकीत होता.डॉ. संजय लाखे पाटील यांनी सदर प्रस्तावात दुरूस्ती करत मराठवाड्याचा ही समावेश करावा अशी मागणी केली. मदत व पुर्नवसन मंञी विजय विड्डेटीवार यांनी आपल्या मागणीस पाठिंबा दर्शवत मराठवाड्यात वीज पडून मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. असे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले तेव्हा. मुख्यमंत्र्यांनी सदर प्रकल्पास मान्यता दिली.
असे स्पष्ट करत डॉ संजय लाखे पाटील म्हणाले,
दरवर्षी विजांच्या कडकडाटांसह पडणाऱ्या पावसामुळे काही ठिकाणी वीज कोसळून माणसांसह जनावरांची जीवित हानी तसेच स्थावर मालमत्तांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान होते . यंदा मान्सून सुरू होऊन एक महिना लोटला. मराठवाड्यात समाधानकारक पाऊस पडला नसला तरी जालना जिल्ह्यासह मराठवाड्यातील काही ठिकाणी वीज कोसळून जीवीत व स्थावर मालमत्तांची हानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.असे डॉ संजय लाखे पाटील यांनी सांगितले. अशा प्रकारच्या आपत्ती जनक घटनांना आळा बसावा व होणारे नुकसान टाळण्यासाठी मराठवाड्यात वीज प्रती रोधक यंत्रणा तातडीने कार्यान्वित करण्याची गरज असल्याचे डॉ. संजय लाखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांसह प्राधिकरण सदस्यांच्या निदर्शनास आणून दिले.
गत महिन्यात आलेल्या चक्रीवादळानंतर राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पाअंतर्गत रायगड जिल्ह्यात वीज रोधक प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या.असे नमूद करत डॉ संजय लाखे पाटील म्हणाले, मराठवाड्यातील बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडतो ग्रामीण भागात घरे, शेतातील गोठे, झाडे यांच्या वर वीज कोसळून जीवीत व स्थावर मालमत्तांची मोठ्या प्रमाणात हानी होते. असे डॉ. संजय लाखे पाटील यांनी बैठकीत स्पष्ट केले. रायगड जिल्ह्याप्रमाणे मराठवाड्यातील वीज कोसळणाऱ्या ठिकाणांचा अहवाल मागवून सदर यंत्रणा कार्यान्वित करावी. अशी आग्रही मागणी डॉ संजय लाखे पाटील यांनी केली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मराठवाड्यात आपत्ती निवारणासाठी महत्वकांक्षी असलेल्या मागणीस मान्यता देत यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहेत.
Leave a Reply