ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

साहित्यरत्न अण्णाभाऊसाठे यांना भारतरत्न देण्याच्या मागणीचा ठराव

January 2, 202215:36 PM 55 0 0

नांदेड – येथील सप्तरंगी बहूउद्धेशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळ महाराष्ट प्रणित आणि नवयान बहूउद्धेशीय सेवाभावी संस्था गोणार आयोजित पहिल्या जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे सूप वाजले. संमेलनाचे उदघाटन नांदेड लोकसभेचे खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते झाले. संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे हे होते तर स्वागताध्यक्ष ह. भ. प. मधुकर महाराज बारुळकर, निमंत्रक गंगाधर ढवळे, आयोजक रणजित गोणारकर होते. या साहित्य संमेलनात एकूण १४ ठराव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. ठरावाचे अनुवाचन सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्यसहसचिव कैलास धुतराज यांनी केले.

जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाच्या निमित्ताने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे याना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात यावा हा पहिला ठराव घेण्यात आला. महाकवी वामनदादा कर्डक यांचे जन्मशताब्दी वर्ष शासनस्तरावर साजरे करणे हा विशेष ठराव घेण्यात आला. त्यानंतर २) मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी, ३) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला देण्यात येणाऱ्या ५० लाखांपैकी काही रक्कम ग्रामीण भागात भरणाऱ्या साहित्य संमेलनाला देण्यात यावी, ४) नांदेड जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीने ग्रामीण साहित्य संमेलनाला निधी उपलब्ध करून द्यावा, ५) ग्रामीण भागातील साहित्य चळवळ आणि साहित्यिकांच्या दर्जेदार साहित्याची साहित्य अकादमीने दाखल घ्यावी, ६) वयोवृद्ध साहित्यिक, कलावंत याना विना अट रु. ५००० मानधन द्यावे, ८) बोली भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी काही नवीन प्रकल्प हाती घ्यावेत,९) जिल्हा परिषद तथा मनपाच्या धर्तीवर तालुक्याच्या ठिकाणी ग्रंथोत्सव भरविण्यात यावा, १०) ग्रामीण भागातील माध्यमिक, उच्च माध्यमिक तथा पदवी महाविद्यालयांना साहित्य संमेलने भरविण्यास शासनाने उत्तेजन द्यावे, ११) शेती मालाला हमी भाव जाहीर करावा आणि तो चार महिन्याच्या आत खरेदी करण्याची व्यवस्था करावी आणि १२) मराठ्यांना ओबीसी कोट्यातुनच आरक्षण द्यावे. १३) शक्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात पण कोणत्याही परिस्थितीत शाळा बंद करण्यात येऊ नयेत असे ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *