जालनाः हिंदवी स्वराज्य सरसेनापती श्रीमंत बाजीराव पेशवा यांच्या पुण्यतिथी निमित्त तुलसी पार्क येथे राऊ प्रतिष्ठान मित्र मंडळ आयोजित रक्तदान तसेच आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामध्ये 18 रक्तदात्यांनी रक्तदान केले व आरोग्य तपासणी केली.
शिबिराच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी जनकल्याण रक्तपेढीच्या कार्यकारी अधिकारी वंदना शेळके तसेच पेढीचे सदस्य व प्रतिष्ठान चे सदस्य उपस्थित होते.
या निमित्ताने निरामय हॉस्पिटल येथील डॉ. विजय जोशी तसेच औरंगाबाद हेडगेवार रुग्णालय येथील कोविड विभागातील कार्यकारी अधिकारी डॉ. लोकेश यांनी रक्तदान शिबिरास भेट दिली व मार्गदर्शन केले. या शिबिरास पूर्ण करण्यासाठी अभिजित कुलकर्णी , प्रसाद देशपांडे , नितीन पवार , विश्वंभर कुलकर्णी, गौरव देशमुख, अजिंक्य खडके , अक्षय कुलकर्णी, प्रदीप रायमल आदींनी परिश्रम घेतले.
Leave a Reply