ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

ऑनलाईन कोरोना जनजागृती व मार्गदर्शन शिबीरास प्रतिसाद; ग्रामीण भागातील नागरीकांसाठी जालना जिल्ह्यातला पहिला उपक्रम

March 22, 202113:42 PM 36 0 0

जालना (प्रतिनिधी) ः जालना जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत होत असलेली वाढ आणि नागरीकात कोरोना महामारीच्या संदर्भात असलेले संभ्रम या बाबत जनजागृती करण्यासाठी उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने दि. 21 मार्च 2021 रोजी सायंकाळी 9.00 वाजता ऑनलाईन मार्गदर्शन शिबीराचे आयोजन केले होते. यावेळी डॉ. राजेश राऊत यांनी गावकर्‍यांना कोरोना संदर्भात मार्गदर्शन केले.

कोरोना महामारी, त्याची लक्षणे, उपाय व काळजी कशी घ्यावी या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले असून नागरीकांच्या मनात असेले प्रश्न आणि भितीचे निवारण यावेळी करण्यात येणार आले. ग्रामीण भागात गावपातळीवर कोरोनाच्या संदर्भात अनेक चर्चा आहेत. काहीजन कोरोना नसल्याचे सांगतात तर काहीजन कोरोनाला फारच घाबरुन जातात. कोरोनाने आता ग्रामीण भागात मान वर काढली असून रुग्णसंख्या ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही रुग्णसंख्या कमी करणे व काळजी घेण्यासाठी शासनाच्या वतीने अनेक योजना आखल्या जात आहेत. त्यात ग्रामीण भागातील नागरीकांचे योगदान वाढावे यासाठी या विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले होतेे. या ऑनलाईन शिबीराचा गावकरी यांच्यासह जिल्ह्याती सर्वांनीच लाघ घेतला. या शिबीरास प्रचंड प्रतिासयद मिळाला असून जनहितार्थ यापुढेही संस्थेच्या वतीने उपक्रम राबविले जाणार आहेत. यावेळी सरपंच सौ. ज्यातीताई राऊत, संस्थेच्या अध्यक्षा सौ. करुणाताई मोरे, रोहीणी बळप, अच्युत मोरे, बालाजी बळप, भागवत राऊत, बद्रीनारायण भसांडे, अंकुश काळे, बळीराम गायकवाड, रामकृष्ण हिवाळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *