ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शिक्षक सेनेच्या ‘एक वही – एक पेन’ अभियानास बेंबर येथे प्रतिसाद हू जयंती ते शिवजयंती राबविण्यात येणार उपक्रम

July 28, 202115:15 PM 17 0 0

नांदेड – जिल्हा शाखा शिक्षक सेनेच्या वतीने ‘एक वही एक पेन’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना एक रजिस्टर व एक पेन इत्यादी शैक्षणिक साहित्य शिक्षकसेना जिल्हा सरचिटणीस रवी बंडेवार सर कडून वाटप करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री कुसुमवाड एस. पी., पालक, शा. पो. आ. कार्यकर्ता व विद्यार्थी उपस्थित होते. भोकर तालुक्यातील जांभळी केंद्रांतर्गत बेंबर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत हा उपक्रम घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना जिल्हा शाखेच्यावतीने आरक्षणाचे जनक तथा लोक कल्याणकारी राजे राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जवळा येथे ‘एक वही – एक पेन’ वाटप करुन जून ते फेब्रुवारी या नऊ महिन्यांच्या अभियानास शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर, उपाध्यक्ष गंगाधर ढवळे यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला होता.


एक वही व एक पेन ही काही वर्षभर पुरेल असे नाही. परंतु कोरोना काळात बेरोजगार झालेल्या सर्वच स्तरांतील कामगार, कारागीर, शेतमजूर यांच्या पाल्यांना आॅनलाईन शिक्षण अयशस्वीच ठरले आहे. त्यामुळे समाजातील दानशूर लोकांनी पुढे येऊन मोठ्या प्रमाणात शालेय साहित्याचे वाटप करावे, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना ही शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासोबतच सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करीत असते. त्याचाच एक भाग म्हणून शाहू जयंती ते शिव जयंती या कालावधीत गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिक्षक सेनेने ‘एक वही- एक पेन’ हा कार्यक्रम हाती घेतला आहे. या अभियानाचा प्रारंभ जवळा देशमुख या गावी करण्यात आला. शाहू महाराज यांच्या १४७ व्या जयंतीनिमित्त राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर गावातील साठ मुला मुलींना ‘एक वही- एक पेनचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम शाहू जयंती ते शिवजयंती या नऊ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या निवडक शाळांमध्ये राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर यांनी सांगितले. या अभियानासाठी शिक्षक सेनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *