जालना (प्रतिनिधी) ः उत्तर प्रदेश लखीपुर येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर केंद्रीय गृह राज्यमंत्री यांच्या मुलाने जिपने चिरडुन सात शेतकरी आणि एका पत्रकाराला ठार मारल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आज सोमवारी महाविकास आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला जालना जिल्ह्यात उत्सर्फुत प्रतिसाद मिळाला. जालना शहरासह जिल्ह्यातील व्यापारी प्रतिष्ठाणाने आणि दुकाने बंद होती. सोमवारी सकाळी 10 वाजता मामा चौक येथे महाविकास आघाडीचे नेते आणि पदाधिकारी बंद करण्यासाठी एकत्रीत जमले होते. आ. कैलास गोरंट्याल यांनी हुतात्मा जनार्दन मामा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन शहरातील पदयात्ररेस सुरुवात केली.
प्रारंभी महाविकास आघाडीच्या वतीने निष्पाप शेतकऱ्यांची हत्या करणाऱ्या आरोपी आणि योगी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात येवून आ. कैलास गोरंट्याल, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, माजी. आ. अरविंदराव चव्हाण यांनी आपल्या भाषणातून उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे या प्रकरणातील आरोपींना वाचविण्यासाठी पुरेपुर प्रयत्न करीत आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणासाठी महाविकास आघाडी आज रस्त्यावर उतरली आहे. योगी आणि मोदी सरकारने शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि आरोपींना कठोर शासन करावे अशी मागणी केली. मामा चौक येथून निघालेली पदयात्रा महाविर चौक मार्गे सुभाष रोड, अलंकार टॉकीज, वीर सावरकर मार्गे फुलबाजर नेहरु रोड काद्राबाद, पाणी वेस येथून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याजवळ समाप्त करण्यात आली. या पदयात्रेत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी योगी आणि मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी केली. आणि शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे घटनेतील सर्व आरोपींना तात्काळ अटक करा अशा मागण्या देखील करण्यात आल्या.
या पदयात्रेत एकबाल पाशा, राजेंद्र राख, प्रा. संत्सग मुंढे, शेख महेमूद, नंदकिशोर जांगडे, विष्णु पाचफुले, विमलताई आगलावे, गणेश राऊत, बाला परदेशी, अभिमन्यु खोतकर, रावसाहेब राऊत, विजय चौधरी, बदर चाऊस, राम सावंत, सय्यद रहिम, संजय दाड, फेरोज लाला, चंद्रकांत रत्नपारखे, डॉ. विशाल धानुरे, घनशाम खाकीवाले, अरुण मगरे, रमेश गोररक्षक, राहुल हिवराळे, शेख फारुक तुंडीवाले, शेख शकील, गणेश घुगे, राजेश काळे, राजेंद्र जाधव, मिर्झा अनवर, अंकुश पाचफुले, अशोक पवार, विजय पवार, आलमखान पठाण, विनोद यादव, शरद देशमुख, मुखतार खान, नारायण वाढेकर, राधेशाम जैस्वाल, आनंद लोखंडे, शेख शमशू, जावेद शेख, नंदा पवार, सुरेश खंडागळे, अजिम बागवान, संविता किवंडे, दिपक रणनवरे, सय्यद निजाम, रहिम तांबोळी, सतोष जांगडे, फकीरा वाघ, तय्यब देशमुख, असलम कुरेशी, शेख फारुक, धमेश निकम, शिवप्रसाद चितळकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रस्ताविक शहर कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद यांनी केले.
Leave a Reply