जालना (प्रतिनिधी) : तालुक्यातील नंदापूर येथे गुरूवारी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबवण्यात आली. यावेळी 190 ग्रामस्थांचे लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण व्हावे, या दृष्टीने मिशन कवच-कुंडल अभियानाचा तिसरा टप्पा 2 नोव्हेंबरपर्यंत राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन लसीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी केले. त्या पार्श्वभुमीवर नंदापूर येथे गेल्या चार-पाच दिवसापासून सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, नोडल अधिकारी, विद्यार्थी, महीला बचत गटाच्या आयसीआरपी यांनी गावात मोठ्या प्रमाणात लसीकरणाची जनजागृती करून नागरीकांच्या मनातील लसीविषयी असलेले गैरसमज दुर केले.
नागरीकांमध्ये जनजागृती झाल्याने गुरूवार ता. 28 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 यावेळेत 190 जणांचे कोविड लसीकरण करण्यात आले. पिरपिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात सहा ठिकाणी लसीकरण सुरू असल्याने स्वतः वैद्यकिय अधिकारी डॉ. हिना मॅडम यांनी नागरीकांचे लसीकरण केले. या वेळी प्रगतशील शेतकरी तथा सरपंच दत्तात्रय चव्हाण, वैद्यकिय अधिकारी डॉ. हीना मॅडम, सहाय्यक वैद्यकिय अधिकारी डॉ. कांचन खांडेभराड, ग्रामसेवक महेश वझरकर, नोडल अधिकारी मुख्याध्यापक श्री बावकर, कुरकुटे, आशासेविका सुरेखा आचलखांब, अलका खरात, अंगणवाडी सेविका सुरेखा भानापूरे, बबीता कासार, मदतनीस कुशीवर्ता घोंगे, सुनंदा उबाळे, आयसीआरपी सुनिता आखाडे, वर्षा खरात, चालक भिमराव म्हस्के, कर्मचारी गजानन कुरधने यांनी लसीकरणासाठी परिश्रम घेतले. यावेळी उत्तम खरात, दादाराव काकडे, संदीप खरात, सुदर्शन उबाळे, राहुल खरात, विठ्ठल कुरधने, महीला ग्रामसंघाच्या ज्योती खरात, सचिव सविता मुळे, पार्वती म्हस्कर यांची उपस्थिती होती.
Leave a Reply