ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

भरारी प्रीमियर लीग काव्यस्पर्धेचे निकाल जाहीर

October 24, 202112:52 PM 37 0 0

घे भरारी या साहित्य समूहाचे वतीने घेण्यात आलेल्या भरारी प्रिमियर लीग काव्यलेखन स्पर्धेचे निकाल जाहीर करण्यात आले असून जयश्री जंगले ह्या सर्वोत्कृष्ट काव्यरचनेच्या तर प्रदिप तळेकर आणि अविनाश शिंदे हे उत्कृष्ट काव्यरचनेचे मानकरी ठरले. घे भरारी साहित्य समूह हा साहित्य क्षेत्रात नव्याने स्थापन झालेला आणि अल्पावधीत नावारूपाला आलेला समूह आहे. समूहाद्वारे घेण्यात आलेल्या ऑनलाइन काव्यलेखन स्पर्धेचा निकाल आज(२२) रोजी समूहाच्या चतुर्थ वर्धापन दिनी जाहीर करण्यात आला. समूहाच्या स्थापना वर्षापासून हा समूह साहित्य लेखनासाठी अनेक नवनवीन उपक्रम राबवत आला आहे. समूहाद्वारे नवोदित लेखकांसाठी आजपर्यंत अनेक कथा, कविता, पत्र, ललित लेखनाच्या स्पर्धा समूहाने आयोजित केल्या आहेत. जालना आणि नाशिक इथं भव्य साहित्य संमेलनाचं आयोजन केलं आहे . यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि लॉकडाऊनच्या काळात समूहाद्वारे भरारी प्रिमियर लीग ह्या काव्यलेखन स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाचं आयोजन करण्यात आले होते. चालू वर्ष हे ह्या स्पर्धेचे तिसरे वर्ष होते. या अनोख्या स्पर्धेची संकल्पना तेजस गायकवाड यांची होती. त्याचा निकाल आणि मंचाच्या वतीने दिले जाणारे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.


ही स्पर्धा सहा साखळी फेर्‍या आणि एक महाअंतिम फेरी अशी होती. ही स्पर्धा अत्यंत पारदर्शक असणारी स्पर्धा म्हणून गौरविण्यात येत आहे. स्पर्धेत सुरुवातीला राज्यभरातून १८६ स्पर्धकांनी सहभाग घेतला. यानंतर सहा वेगवेगळ्या काव्य प्रकारात विषयनिहाय साखळी स्पर्धा रंगत गेली. त्यानंतर साखळी फेरीतून जास्तीत जास्त स्पर्धक बाद होऊन अंतिम फेरीसाठी ५६ स्पर्धक पात्र ठरले. त्यातून जयश्री जंगले ह्या सर्वात जास्त गुण मिळवत सर्वोत्कृष्ट ठरल्या. तर प्रदिप तळेकर आणि अविनाश शिंदे हे उत्कृष्ट काव्यरचनेचे मानकरी ठरले. प्रथम क्रमांकावर विरेनकुमार खोब्रागडे, गोविंद ठोंबरे, आणि प्रशांत भंडारे हे आहेत. द्वितीय स्थानावर आकाश जाधव, सोमनाथ एखंडे, आणि सुरेखा वाडकर हे आहेत. तर प्रदिप मडावी, मालती सेमले आणि छाया पाटील हे तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरलेत. साखळी फेऱ्यांतून अव्वल येण्याचा विक्रम अनुक्रमे रोहिदास होले, संगीता माने, दीपा पराडकर, माधवी कांबळे, वैशाली माळी या कवी कवयित्रींनी केला. वरील सर्व क्रमांकाचे मानकरी ठरलेल्या स्पर्धकांना लवकरच होणाऱ्या समूहाच्या तिसऱ्या संमेलनात पुरस्कार व बक्षीस वितरित करण्यात येईल. अशी माहिती आयोजक तेजस गायकवाड यांनी दिली. स्पर्धा निकोप होण्यास अनेकांचे सहकार्य लाभले. नामवंत साहित्यिकांनी स्पर्धेत परीक्षण केले. ह्यामध्ये चंद्रशेखर गोखले, डॉ. प्रभाकर शेळके, डॉ. नयनचंद्र सरस्वते, शाहीर रंगराव पाटील, शाहीर युवराज पाटील, अनिल दिक्षित, डॉ. स्नेहल कुलकर्णी, भाविक सुखदेवे, तेजस गायकवाड ह्या मान्यवरांनी साखळी फेर्‍यांचे परीक्षण केले. तसेच चंद्रकांत वानखेडे, डॉ. मारोती कसाब, अभ्यासक्रमातील साहित्यिका डॉ. प्रतिमा इंगोले यांनी महाअंतिम फेरीचे परीक्षण केले. संपूर्ण स्पर्धेचे नियोजन अध्यक्ष तेजस गायकवाड, उपाध्यक्ष पवन तिकटे, कार्यकारी अध्यक्ष पुरुषोत्तम चंद्रात्रे यांनी केले. या स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांचे ग्राफिक्स आणि इतर सहाय्य श्रीनिवास येईलवाड तर तंत्रसहाय्यक म्हणून अनुराग गजपुरे यांनी धुरा सांभाळली. मुंबईच्या निओडरमिस स्किन हेअर लेझर क्लिनिक ने ही स्पर्धा प्रायोजित केली होती. तर माधवी कांबळे, अंकिता गिरी, पल्लवी अहिरे यांचं संकलनासाठी महत्वपूर्ण सहकार्य होतं. स्पर्धच्या नियोजनावर कैलास दिनकर लक्ष ठेवून होते. ज्यामुळे स्पर्धा निकोप होण्यास सहकार्य लाभलं.अशी माहिती संयोजक समितीने हिरकणीला दिली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *