सातारा,(विदया निकाळजे ) माझ्या गावाच्या मातीतील माणसांनी केलेला सन्मान फार महत्वाचा आहे असे भावूक उद्गार श्री सुनील काटकर यांनी काढले. सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथील सीमा सुरक्षा दलातील जवान श्री सुनील काटकर आपली नियमित सेवा पूर्ण करून नुकतेच सेवा निवृत्त झाले होते.स्वराज्य करिअर अकॅडेमीच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यात श्री काटकर बोलत होते.
आपल्या सैन्यातील कालावधीत दहिवडी येथील मोरे मळा येथील जवान श्री सुनील काटकर यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन सर्वोत्कृष्ट कमांडो,सर्वोत्कृष्ट नेमबाज,डायरेक्ट जनरलपदक यासारखे पुरस्कार आणि सन्मान प्राप्त केले आहेत.
प्रारंभी स्वराज्य करिअर अकॅडमी च्या वतीने श्री काटकर यांची फुलांनी सजविलेल्या बैल गाडीतून मिरवणूक काढण्यात आली यानंतर प्राथमिक शिक्षक बँकेचे व्हाईस चेअरमन महेंद्र अवघडे स्वराज्य चे संस्थापक अध्यक्ष दिलीप शिरकुळे ,सयाजी मोरे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते श्री सुनील काटकर यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी मान्यवरांनी स्वराज्य करिअर अकॅडेमीच्या कार्याचा आढावा घेऊन कौतुकाची व शाबासकीची थाप दिली.
श्री सुनील काटकर यांचा आदर्श घेऊन सर्वांनी गावाचे ,देशाचे नाव उज्वल करावे असे आवाहन श्री दिलीप शिरकुळे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बिरा लोखंडे यांनी केले.
Leave a Reply