ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जिल्ह्यात नवरात्रोत्सव साजरा करण्याबाबत जिल्हादंडाधिकारी यांचे सुधारित आदेश निर्गमित

October 6, 202115:06 PM 4 0 0

जालना :- दि. 7 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर 2021 दरम्यान नवरात्र, दुर्गापुजा, दसरा सण साजरा करण्यात येणार असुन कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अजुनही कोरोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे नागरीकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करुन उत्सव साजरा करणे उचित होणार नसल्यामुळे नवरात्रोत्सव साजरा करतांना सर्व नागरीकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातुन योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक असल्यानेजिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन डॉ. विजय राठोड यांनी जालना जिल्ह्यामध्ये नवरौत्सव -2021 साजरा करण्याबाबत सुधारीत मार्गदर्शक सुचनानुसार एका आदेशान्वये निर्गमित केल्या आहेत. कोविड -19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र शासन महसुल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या परिपत्रकानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आदेशानुसार ब्रेक द चेन अंतर्गत दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करावे. सार्वजनिक नवरात्रौत्सवासाठी मंडळांनी नगर पालिका, नगर पंचायत, स्थानिक प्रशासन यांनी त्यांच्या धोरणानुसार यथोचित पुर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोविड -19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता आणि नगर पालिका, नगर पंचायत संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. यावर्षीचा नवरात्रौत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याच्या अनुषंगाने घरगुती तसेच सार्वजनिक देवीच्या मुर्तीची सजावट त्या अनुषंगाने करण्यात यावी. देवीच्या मुर्तीची उंची सार्वजनिक मंडळाकरीता 4 फुट व घरगुती देवीच्या मुर्तीची उंची 2 फुटांच्या मर्यादेत असावी. मागील वर्षी प्रमाणे शक्यतो देवीच्या मुर्तीऐवजी घरातील धातु, संगमरवर आदी मुर्तीचे पुजन करावे. मुर्ती शाडुची, पर्यावरणपुरक असल्यास तिचे विसर्जन शक्यतो घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास कृत्रीम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनांशी समन्वय ठेवावा. नवरात्रौत्सवाकरीता वर्गणी, देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी. तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेबाबत देखील जनजागृती करण्यात यावी. गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत. त्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रमे, शिबिरे उदा. रक्तदान शिबीर आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यु इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबात जनजागृती करण्यात यावी.

देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी. देवीच्या मंडपांमध्ये प्रत्यक्ष येऊन दर्शन घेणा-या भाविकांच्या बाबतीत शासन सार्वजनिक आरोग्य विभाग आदेशानुसार ब्रेक द चेन अंतर्गत दिलेल्या सुधारित मार्गदर्शक सुचनांनुसार एसओपी प्रमाणे सर्व सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. आरती, भजन, किर्तन वा अन्या धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही. तसेच ध्वनी प्रदुषणा संदर्भातील नियमांचे व तरतुदींचे पालन करण्यात यावे. मंडपात एकावेळी 5 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी. तसेच मंडपांमध्ये खाद्यपदार्थ अथवा पेयपानाची व्यवस्था करण्यास सक्त मनाई असेल. देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरीकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील, इमारतीतील सर्व घरगुती देवीच्या मुर्तीच्या विसर्जनाची मिरवणुक एकत्रितरीत्या काढण्यात येऊ नये. नगरपालिका, नगरपंचायत, गृहनिर्माण संस्था, लोक प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने कृत्रीम तलावांची निमिती करण्यात यावी. तसेच नागरीकांची गर्दी टाळण्यासाठी स्थानिक प्रशानाने प्रभाग समितीनिहाय मुर्ती स्वीकृती केंद्रांची व्यवस्था करावी व याबाबत जास्तीत जास्त प्रसिध्दी देण्यात यावी. विसर्जनाच्या तारखेस जर घरगुती तसेच सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचा परिसर प्रतिबंधीत क्षेत्रात असेल तर, मुर्ती विसर्जन सार्वजनिक ठिकाणी करण्यास मनाई असेल. दस-याच्या दिवशी करण्यात येणारा रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळुन करावा. रावण दहनाकरीता आवश्यक तेवढ्या किमान व्यक्तीच कार्यक्रम स्थळी हजर राहतील. प्रेक्षक बोलावू नयेत. त्यांना फेसबुक इत्यादी समाज माध्यमातुन थेट प्रक्षेपणाद्वारे बघण्याची व्यवस्था करावी. कोविड-19 या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्य मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगर पालिका, नगर पंचायत, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. या आदेशानंतर व प्रत्यक्ष उत्सव सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सुचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.
या आदेशाची कडक अंमलबजावणी सर्व संबंधित यंत्रणांनी करावी. कुठल्याही व्यक्तीकडुन या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांच्या विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51, साथरोग 1897 व भारतीय दंड संहिता 45 ऑफ 1860 कलम 188 नुसार दंडनिय, कायदेशीर कारवाई करण्याबाबतही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *