ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

संधीवात रोग

October 27, 202114:19 PM 85 0 0

संधीवात या रोगात, सांधे आणि शरीराच्या इतर भागांमध्ये सूज उद्भवते आणि रुग्ण वेदनांनी त्रस्त राहतो. चालण्यात त्रास व वेदना जाणवतात. या रोगामुळे शरीराच्या तंतुंमध्ये विकार निर्माण होतो, रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते, सांधे सूजतात, चालण्यात त्रास होतो. कधीकधी ताप येतो, भूक न लागणे देखील या आजाराचे लक्षण आहे. वेळेवर उपचार न केल्यास डोळे, फुफ्फुसे, हृदय आणि इतर अवयव प्रभावित होऊ लागतात.

संधिवात कारणे

१) अनुवांशिक कारणे

२) चुकीचे फास्ट फूड

३) सांध्यावर अधिक शारीरिक दबाव,

४) जोड्यांचा कमी किंवा जास्त वापर करणे

५) तंतुंमध्ये विकार आणि चयापचय मध्ये त्रास.

६) थंड वातावरणात राहण्या मुळे दुष्परिणाम

७) वृद्धत्व आणि हार्मोन असुंतुलन

काय काळजी घ्यावी ?

१) सर्वात महत्वाचे म्हणजे रुग्णाला हवामानानुसार २४ तासांत ३ते ४ लिटर पाणी पिण्याची सवय लावावी. यूरिक अँसिड शरीराच्या सांध्यामध्ये जमा होतो आणि त्यापासून या वायू रोगाचा जन्म होतो. जास्त पाणी प्यायल्यामुळे जास्त लघवी होईल आणि यूरिक अँसिड बाहेर निघून जाईल

२) फळं आणि हिरव्या भाज्या आपल्या आहारात मुबलक प्रमाणात समाविष्ट करा. त्यात समृद्ध अँटीऑक्सिडेंट असतात ज्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती बळकट होते. रोजाना ५०-५० ग्रॅम फळे किंवा भाज्या किंवा दोन्ही वापरत रहा. जर तुम्ही यांचा रस प्यायला तर तुम्हाला तेच फायदे मिळतील.

३) ताज्या गाजरचा रस आणि लिंबाचा रस समान प्रमाणात मिसळा आणि दररोज अर्धा कप सेवन करा.

४) काकडीचा रस पिल्याने संधिवातात फायदेशीर ठरते.

५) संधीवात असलेल्यांनी हिवाळ्यामध्ये उन्हात बसावे. त्यामुळे Vit-D तयार होते

६) चहा, कॉफी, मांसामुळे रुग्णालां आजार उद्भवू शकतात त्यामुळे ते टाळावे. किमान प्रमाण तरी कमी करावे.

७)साखरेचा वापर हानिकारक असतो.

८) तळलेले अन्न, मीठ, साखर, मिरची-मसाले, अल्कोहोल वर्ज्य असते..

९) संधीवाताच्या रुग्णाला आठवड्यातून दोन दिवस उपवास करणे आवश्यक आहे.

१०) कॉड लिव्हर ऑईल 5 ml. सकाळी आणि संध्याकाळी घेतल्यास संधीवात कमी होऊन त्वरित लाभ मिळतो.

११) कॅल्शियम आणि व्हिटॅमिन-डी पूरक आहार घेणे आवश्यक असते.. जर आपण हे जीवनसत्त्वे अन्नाद्वारे घेत असाल तर ते अधिक चांगले .

१२) तीन लिंबू रस आणि 40 ग्रॅम इप्सम सॉल्ट अर्धा लिटर गरम पाण्यात मिसळा आणि एका बाटलीमध्ये भरा. आणि हे सकाळी आणि संध्याकाळी 5 मिलीलीटर औषध प्या. ही कृती खूप प्रभावी आहे.

१३) संधीवात रोगात बटाट्याचा रस पिण्याने आराम मिळतो. दररोज २०० मिलीलीटर रस प्यावे हा पण प्रयोग प्रभाव शाली आहे.

१५) अधिक पायर्‍या चढणे हानिकारक आहे.

१६विश्रांती दरम्यान संतुलन राखणे महत्वाचे आहे.

१७) आल्याचा रस पिल्याने संधीवातात होणाऱ्या वेदना कमी होते.

१८) मिक्सरमध्ये जवस (अळशी) बिया घालून पावडर बनवा. आणि सकाळी २० ग्रॅम आणि संध्याकाळी २० ग्रॅम पाण्यात घ्या. यामध्ये ओमेगा फेटी अँसिड असते, जे या आजारात खूप फायदेशीर मानले गेले आहे. यामुळे बद्धकोष्ठता टाळण्यास देखील मदत होते. जवसाच्या सेवनाने अंगात कधी उष्णता होऊ शकते. जर असे झाल्यास प्रमाण कमी करावे आणि पाणी मात्र भरपूर प्यावे.

१९) चोपचीनी: कोकणात यास घोट वेल म्हणतात. जर ही मिळत असेल तर तिचा काढा करून प्यावा याने युरीक अँसीड कमी होईल.

२०) शिवाय निलगिरी तेल, दालचीनी तेल, राई तेल, कापूर आणि लवंग तेल ही बाजारातून आणून सम प्रमाणात मिक्स करून याने घुडगे किंवा दुखंणाऱ्या भागावर नित्य मालिश करून त्या भागावर सोसवेल इतक्या गरम पाण्याची धार धरावी. याने घामावाटे युरीक अँसीड तसेच त्या भागातील विष द्रव्ये निघून जातील.

अशा आजारासाठी असे काही उपाय आपण घरच्या घरी करुन गुण तर येईलच. पण कोणत्याही गोष्टीत जर श्रध्दा ठेवली आणि श्रध्दा पूर्वक केली तर तर त्याचा परिणाम पण चांगलाच येतो.

कोणत्याही प्रकारच्या सांधे दुखीत लेसर उपचाराने अराम मिळतो

उपचार साठी खालील पत्यावर भेटा –

डॉ शिवाजी काळेल
(MD.BAMS)
शॉप नं 1,
साई सिद्धी क्लिनिक, लक्ष्मी नगर, घाटकोपर (पूर्व )

Categories: आरोग्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *