ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

अन्याया विरोधात पेटून उठा – कामगारनेते. महेंद्र घरत

August 2, 202115:12 PM 55 0 0

उरण(संगिता पवार) ITF व NMGKS यांच्या संयुक्त विद्यमाने ITF -U2U युनियन बिल्डिंग इंडियन हब्स या कार्यशाळेचे आयोजन खंडाळा येथील कामगारांचे हक्काचे भवन असलेले श्रम साफल्य भवन येथे 2 दिवशीय कार्यशाळेचे आयोजन. कामगारनेते मा.श्री. महेंद्रशेठ घरत साहेब यांच्या NMGKS संघटनेच्या माध्यमाने करण्यात आले होते.त्या वेळी ते बोलत होते. या कार्यशाळेचे उदघाट्न 30 जुलै रोजी सकाळी 9.30 वाजता मनिबेनकारा इन्स्टिट्यूट चे डायरेक्टर श्री. राजेंद्र गिरी साहेब, संघटनेचे कार्याध्यक्ष श्री पी के रमण साहेब व सरचिटणीस वैभव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यशाळेत रायगड जिल्ह्यातील विविध कंपनीतील 25 कामगार प्रतिनिधींनी भाग घेतला होता.या कार्यशाळेत बहुताऊंश हे युवा कामगार प्रतिनिधी होते.


कामगार क्षेत्रात काम करत असतांना. अनेक समस्यानां सामोरे जायला लागत असते.त्या साठी युनियन चे महत्व काय असते. अनेक ठिकाणी कामगार हे संघटित नाहीत ते असंघटित आहेत. याचा फायदा कंपनी व्यवस्थापण घेत असते. अश्या कामगारांना संघटनेचे महत्व पटवून देऊन त्यांना संघटनेत सामिल करून घेतले गेले पाहिजे. त्याचं बरोबर अनेक कामगारांना किमान वेतन सुद्धा कंपनी व्यवस्थापन देत नाहीत त्यांच्या मजबुरीचा फायदा कंपनी मालक घेत असतो. त्यावर संघटना कश्या पद्धतीने कायदेशीर काम करते याची माहिती कामगारांना या कार्यशाळेत दिली जाते.त्याच बरोबर कंपनीच्या तुलनेत कामगार हा दुबळा असतो. तो मालका विरोधात आवाज उठवत नाही. जबरदस्तीने कमी पगारात त्यांच्या कडून जास्त काम करून घेतले जाते. हा एक प्रकारे त्यांच्यावर अन्याय असतो परंतु मालकाच्या विरोधात एखादा कामगार आवाज उठवतो त्या वेळी त्याला कामावरून काढून टाकण्याचा प्रयत्न किंवा धमकी दिली जाते. त्याला कामगार घाबरू जातात परंतु कामगार संघटित असतील आणि संघटना असेल तर मालक घाबरून जातात. इतका प्रभाव संघटनेचे असते. अशा प्रकारचे मार्गदर्शन या कार्यशाळेत केले जाते. कार्यशाळा घेण्याचे उद्दिष्ट जेणेकरून कोणत्याही गरीब कामगारांवरती अन्याय होऊ नये. त्यांचा छळ होऊ नये. त्यांना त्यांच्या अधिकारांची जाणीव व्हावी. कामगारांचे जीवनमान उंचवावे हि भावना असते.कामगार नेते महेंद्रशेठ घरत साहेब वर्ष्यातून किमान दोन वेळा अश्या कार्यशाळेचे आयोजन करत असतात. त्यामागे त्यांचे एकच ध्येय असते का प्रत्येक कामगारांना त्याचे अधिकार काय आहेत.याची माहिती कामगारांना असावी का आपण संघटित असावे. त्याचे फायदे काय असतात या साठी हि कार्यशाळा घेतल्या जातात.
दोन दिवशीय चालेल्या या कार्यशाळेच्या सांगता समारंभात राष्ट्रीय इंटकचे सचिव. कामगारनेते. मा महेंद्रशेठ घरत साहेब. म्हणाले कि कामगारांनी कंपनीत अन्याय सहन करून घेयाच नाही. आपण जे श्रम करतोय त्याचा योग्य मोबदला आपल्याला मिळालाच पाहिजे. आणि तो का जर. मिळत नसेल तर तो आपण संघटनेच्या माध्यमातून कायद्याने मिळवीला पाहिजे. या साठी संघटना असणे गरजेचे असते.
या वेळी रायगड सुरक्षा रक्षक मंडळातील.सुरक्षा रक्षक श्री योगेश रसाळ यांना संघटनेचे आध्यक्ष. कामगार नेते. मा श्री. महेंद्रशेठ घरत साहेब यांच्या हस्ते 2020/21 या वर्षी चा NMGKS आदर्श कामगार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी मनिबेनकारा इन्स्टिटयूट चे डायरेक्टर श्री. राजेंद्र गिरी साहेब,संघटनेचे कार्याध्यक्ष.पी के रमण साहेब,सरचिटणीस वैभव पाटील , उपाध्यक्ष किरिट पाटील,संघटक आनंद ठाकूर,कल्पना ठाकूर, गोदावरी कदम,विवेक म्हात्रे, आदित्य घरत व कामगार प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार श्री. किरिट पाटील साहेब यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *