ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

 रोडचे खड्डे बनले नागपूरकरांसाठी डोकेदुखी

October 1, 202114:10 PM 44 0 0

मनपा प्रशासनाच्या व नगरसेवकाच्या चुकीच्या धोरणांमुळे नागपूमध्ये खड्यांचा अंबार. रोडवरील खड्डे म्हणजे दुर्घटनेला जाहीर आमंत्रणच म्हणावे लागेल.कारण खड्यांमुळे अनेक दुर्घटना होतांना आपण पहातो.यात अनेकांना आपले प्राणसुध्दा गमवावे लागतात.रोडला कुठे आणि कीती खड्डे पडले आहेत याचा लेखाजोखा मनपा प्रशासनाजवळ आहे.कारण नागपूरमध्ये 151 नगरसेवक आहेत व वेगवेगळे झोनसुध्दा आहेत.जर प्रत्येक नगरसेवकांनी आपापल्या विभागातील खड्यांची पडताळणी केली व त्याची दुरुस्ती केली तर नागपूरातील खड्डे बुजवायला फक्त 10 दिवसाच्या आत संपूर्ण खड्डे बुजवीले जावु शकते.परंतु आश्र्चर्याची गोष्ट म्हणजे नागपूरकरांना पुढील तीन महिने खड्यापासून सुटका मिळणार नसल्याचे मनपा प्रशासनाकडुन स्पष्ट झाले आहे.लांबलेला पाऊस, त्यामुळे वाढलेली खड्यांची संख्या व इतर तांत्रिक अडचणीमुळे 31 डिसेंबरपर्यत डागडुजी व दुरुस्ती शक्य नसल्याची हतबलता मनपा प्रशासनाकडून 27 सप्टेंबर सोमवारला आली.यावरून स्पष्ट दिसून येते की तीन महिने नागपूरातील खड्डे मुक्ती नाहीच हे मनपा प्रशासनाकडून आलेले वक्तव्य अत्यंत निंदनीय व दुर्भाग्यपुर्ण आहे.यावरून असे दिसून येते की लोक खड्यात गेले तरी चालेल परंतु तत्काल खड्डे मुक्ती नाहीच.नागपूर मनपा अंतर्गत 6 आमदार येतात व 151 नगरसेवक येतात यांना आपण लोकप्रतिनिधी, जनप्रतिनिधी, समाजसेवक म्हणतो यांचे नागपूरच्या खड्यांकडे लक्ष नाही काय? असे सांगण्यात येत आहे की मनपाची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे.

मनपा प्रशासन रोड टॅक्स,स्ट्रीट लाईट टॅक्स इत्यादी अनेक प्रकारचे टॅक्स नागपूरकरांजवळुन वसुल करतात मग रोडचे खड्डे बुजवायला पैसा मुळातच नाही काय? मनपा प्रशासन आपला एखादा खर्च कमी करून खड्डे बुजवीण्याकडे लक्ष का देत नाही? लोकांनी खड्यातच मरावे काय? असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या समोर उपस्थित होतात.महानगर पालिका ही नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने निर्माण केली आहे. मग मनपा प्रशासन व नगरसेवक नागरिकांना पुर्ण सुविधा का देत नाही?रोडचे खड्डे ही साधी बाब नाही.कारण रोडचा एक छोटासा खड्डा परिवारात अंधकार निर्माण करू शकतो.मी म्हणतो नगरसेवकांनी रोडचे खड्डे बुजवीण्याकरीता प्रशासनाची वाट का पहावी? नगरसेवक हा नगरची सेवा करण्यासाठी नियुक्त करण्यात आला आहे.त्यानी समाजसेवक या नात्याने स्वत:हुन खड्डे बुजवीण्यासाठी कंबर कसली पाहिजे.कारण नगरसेवकांना मत पाहिजे असते तेव्हा घरोघरी जाऊन मत मांगायचे आणि निवडूण आल्यानंतर कोणत्याही कामाचा ठीकरा प्रशासनावर फोडायचा हे कसले नगरसेवक म्हणावे! नगरसेवकांमध्ये हिंमत असेल तर प्रत्येक नगरसेवकांनी प्रशासनाची तीन महिन्यांची वाट न पाहता “श्रमदानाच्या” माध्यमातून खड्डे बुजवीण्यासाठी संपूर्ण नगरसेवकांनी सामोर आले पाहिजे.तेव्हाच त्याला खरा नगरसेवक म्हटल्या जाईल.मनपा प्रशासन जाहिरपणे सांगते की सध्या खड्यांच्या बाबतीत मुक्ती नाहीच हे चाल्लय तरी काय! आजही नागपूर शहरात प्रत्येक रोडला मोठ्या प्रमाणात खड्डे दिसून येतात.यावरून स्पष्ट होते की मनपाचे खड्डे बुजवीण्याची प्रक्रीया फक्त फाईल पुरतीच सीमीत असल्याचे दिसून येते.मागील दोन वर्षांपासून खड्डे दुरूस्तीसाठी मनपाने 34.89 करोड रुपयांची तरतूद केली होती.परंतु खड्डे दुरूस्तीसाठी फक्त 7.02 करोड रुपये खर्च करण्यात आले.यावरून स्पष्ट होते की रोडच्या खड्यांच्या बाबतीत मनपा प्रशासन किती नीष्काळजीपणा करीत आहे हे दिसून येते.नागरिकांच्या समस्येच्या बाबतीत मनपा सध्याच्या निद्रा अवस्थेत आहे हेही स्पष्ट दिसून येते.म्हणजे वर्ष 2020-21 मध्ये 17.81 करोड रूपये खर्च करायचे होते.परंतु फक्त 4.68 करोड रुपये खर्च करण्यात आले.तर 2021-22 मध्ये 17 करोड रुपयांमधुन आतापर्यंत फक्त 2.44 करोड रूपये खर्च करण्यात आले.म्हणजे पैसा असुन सुद्धा नागरिकांच्या मुलभूत कामाकडे दुर्लक्ष करणे हा मनपा प्रशासनाचा गुन्हा नाही काय?यावरून स्पष्ट होते की खड्डे बुजवीण्याची ही कासवाची चाल नागरिकांसाठी घातक सीध्द होवु शकते.करीता मनपा प्रशासन व नगरसेवकानी एकत्र येऊन खड्डे बुजवीण्यासाठी युध्दपातळीवर उपाययोजना करण्याची गरज आहे.अन्यथा थोडीशी लापरवाही जिंदगीवर भारी पडु शकते याला नाकारता येत नाही.त्यामुळे रोडच्या खड्यांच्या बाबतीत प्रशासनाने व नगरसेवकानी सावध होने गरजेचे आहे.रोडचे खड्डे नागपूरसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी घातक आहे.त्यामुळे महाराष्ट्र सरकारने ज्या ज्या भागात खड्यांचे प्रमाण जास्त आहे त्या संपूर्ण क्षेत्राचे निरीक्षक करून खड्डा मुक्तीसाठी युध्दपातळीवर कामाला लागले पाहिजे.
लेखक
रमेश कृष्णराव लांजेवार.
(माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर)
मो.नं.9921690779, नागपूर.

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *