सातारा /कराड प्रतिनिधी यांचेकडून पाटण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील रस्ते, पूल, पाणीपुरवठा आणि विद्युत पुरवठा विस्कळीत झाला असल्याने तालुक्यातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. आता लोकांची अडचण दूर करून सर्व कामे पूर्ण होणे गरजेचे असून येत्या ७२ तासांत तालुक्यातील रस्ते पूल वाहतुकीसाठी खुले करा तसेच आपतग्रस्तांसाठी तात्पुरत्या निवाऱ्याची तातडीने उभारणी करा, अशा स्पष्ट सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी प्रशासनाला दिल्या.
पाटण तालुक्यातील अतिवृष्टी व महापुरामुळे झालेले नुकसान व त्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी सातारा सिंचन मंडळाचे अधिक्षक अभियंता संजय डोईफोडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय उत्तुरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता खलाटे, जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता खैरमोडे, वीज वितरण कंपनी कार्यकारी अभियंता अभिमन्यू राख, कोयना धरण व्यवस्थापन कार्यकारी अभियंता पोतदार,लघुसिंचन जलसंधारण प्रभारी कार्यकारी अभियंता पवार, पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे,प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित पाटील,गटविकास अधिकारी मीना साळुंखे,सार्व.बांधकाम विभागाचे उपअभियंता अजित पाटील,व्ही.डी.शिंदे तसेच विविध खात्याचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते
Leave a Reply