ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

रोह्याचे गोल्डन शुगर कलिंगड उरण बाजार पेठेत दाखल

February 12, 202216:15 PM 48 0 0

उरण ( संगिता पवार ) : उन्हाचा तडाखा वाढण्यापूर्वी उरण बाजारात रोह्याचे गोल्डन शुगर गारेगार कलिंगड दाखल झाले असून नागरिक कलिंगड करतांना दिसत आहेत . कलिंगडा च्या हंगामाची सुरुवात जानेवारी महिन्यात होते .जून महिन्या पर्यंत हा हंगाम सुरु असतो .अवकाळी पावसामुळे यंदा कलिंगडा चा हंगाम काहीसा लांबणीवर पडला त्यामुळे पुढील आठवड्यात कलिंगडा ची आवक आणखी वाढेल .उन्हाळ्यात मागणी वाढत आहे

कलिंगड च्या आकारावरून किंमत ठरविली जाते लहानांत लहान १०० रुपये तर मोठे आकाराचे 210 रुपये अश्या भावाने आम्ही विकतो .असे रोह्या तालुक्यातील तळाघर येथील कलिंगड विक्रेते निशिकांत मधुकर गुरव यांनी सांगितले .
गडद हिरव्या रंगाची कलिंगड शुगर किंग ,गोल्डन शुगर या नावाने ओळखले जातात .फ्रुट सलाड आणि ज्युस बनविण्यासाठी हि कलिंगडे मोठ्या प्रमाणात वापरली जातात .जस जसे तापमान वाढते तशी कलिंगडा ना मागणी वाढत असल्याचे कलिंगड विक्रेती मुक्ता शशिकांत गुरव यांनी सांगितले .
उन्हाची काहिली वाढल्यावर कलिंगड आम्ही विकत घेतो .गोल्डन शुगर व शुगर किंग कलिंगड बाहेरून काळेभोर आणि गर लाल असणारी गोल्डन शुगर कलिंगडे नागरिकांना पसंतीत उतरतात  मधुकर पेडणेकर ग्राहक (उरण )यांनी असे यांनी सांगितले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *