ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मंत्रालयातील चित्रमय प्रदर्शनास रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांची भेट

March 17, 202212:31 PM 42 0 0

मुंबई, दि. 16 : शासनाच्या द्विवर्षपूर्ती निमित्त गेल्या दोन वर्षात शासनाने केलेल्या कामगिरीवर आधारित माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित चित्रमय प्रदर्शनास रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी भेट देऊन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (प्रशासन) गणेश रामदासी, संचालक (वृत्त व जनसंपर्क) दयानंद कांबळे यांची उपस्थित होती.
राज्य शासनाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त विविध विभागांनी घेतलेल्या निर्णयांची माहिती देणारे ‘दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची’ या संकल्पनेवर आधारित प्रदर्शन मंत्रालयात आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन माहितीपूर्ण आणि उपयुक्त असून किल्ल्याच्या भिंतींच्या पार्श्वभूमीवरील मांडणी देखील अतिशय आकर्षक असल्याची प्रतिक्रिया यावेळी श्री भुमरे यांनी व्यक्त केली.
सर्व विभागांनी या दोन वर्षात घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती या चित्रमय प्रदर्शनातून अतिशय आकर्षक पद्धतीने मांडणी करण्यात आली आहे. चिरेबंदी किल्ल्याच्या उंच भिंतीची उत्तुंगता आणि त्या पार्श्वभूमीवरील प्रदर्शन पॅनल यांचा एकत्रित अनुभव घेता यावा यादृष्टीने तयार केलेल्या नाविन्यपूर्ण फिरता ३६० डिग्री सेल्फी पॉईंट आकर्षून घेत असल्याचे श्री भुमरे यांनी सांगितले. फलोत्पादन मंत्री श्री.भुमरे यांनीही येथे सेल्फी व्हिडीओ घेतला.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *