ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

रोहयोच्या ऑपरेटरकडून मजुरांसह अधिकार्‍यांना ”चकवा” जालना तालुक्यात रोहयो राम भरोसे; मजुरांवर आली उपासमारीची वेळ

June 11, 202113:08 PM 92 0 0

अच्युत मोरे

कोरोनामुळे अनेकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. ज्यांना रोजगार आहेत ते मात्र अंगात आल्यासारखे करीत आहेत. कोरोनासारख्या महामारीने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. ग्रामीण भागात कामगारांच्या हाताला काम मिळावे, त्यांच्या परीवाराचा उदर निर्वाह चालवता यावा यासाठी रोहयोच्या कामांना शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. या मजुरांना वेळेवर रोजगार मिळावा, त्यांना अडचणी येऊ नयेत यासाठी तालुका स्तरावर डाटा एन्ट्री ऑपरेटर तर एक पालक तांत्रीक अधिकारी नियुक्त केले आहेत. तसेच गाव पातळीवर रोजगार सेवकांची नियुक्ती करुन मजुरांच्या अडचणी दुर करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु तालुका स्तरापासून ते गाव स्तरापर्यंत मजुरांची आडवणूक केली जात आहे.

 

वेळेवर मस्टर मिळत नाहीत, जॉब कार्डची मागणी करुनही जॉब कार्ड मिळत नाहीत. त्यामुळे अनेक मजुर कामापासून वंचित राहत आहेत. तर जे मजुर रोहयो अंतर्गत काम करीत आहेत त्यांच्या कामाच्या नोंदी वेळेवर केल्या जात नाहीत, मस्टर काढले जात नाहीत. त्यामुळे मजुरांना कामाचा मोबदला वेळेवर मिळत नाही. नागरीकांच्या तक्रारीचा पाऊस पडूनही कार्यवाही होत नसल्याने त्यांच्या मनमानी कारभारात भर पडत आहे. कार्यालयात थांबा, कार्यालय सोडून जाताना हालचाल रजिस्टरवर नोंद करा अशा सुचना गटविकास अधिकारी देत असतांनाही त्यांच्या हातावर तुरी देत हे ऑपरेटर कार्यालय वार्‍यावर सोडून पसार होतात. ज्यांनी चिरीमीरी दिली त्यांचे मस्टर नेट कॅफेवर बसून काढून दिले जातात. त्यामुळे भ्रष्टाचाराला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळत आहे.

 

ग्रामीण भागातील नागरीक पंचायत समितीच्या दारावर दिवस दिवस बसून ऑपेरेटरची वाट पाहत असतात. दिवसभर थांबूनही ऑपरेटर येत नसल्याने मजुर रिकाम्या हातानेच माघारी फिरतो. त्यामुळे मजुरांच्या हातात पगार तर नाही परंतु निराशा कायम पडते.
अशा कामचुकार आणि सर्वसामान्य जनतेला त्रास देणार्‍या कंत्राटी कर्मचार्‍यांवर अधिकार्‍यांकडून कारवाई होणे अपेक्षीत आहे. परंतु त्यांना पाठीशी घालन्याचा प्रयत्न अधिकारी करीत असल्याने त्यांच्या बेजबाबदार पणाचा कळस गाठला आहे. या प्रकारवर आळा घालन्यासाठी अधिकार्‍यांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी नागरीकातुन होत आहे.

https://indianfast.com/

https://indianfast.com/

* तालुका स्तरावरचे कार्यालय वार्‍यावर

ग्रामीण भागातील नागरीक आणि रोजगार सेवक यांच्या सेवेसाठी व त्यांची कामे वेळेवर निकाली निघावीत यासाठी स्वतंत्र रोहयो कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्या कार्यालयात संगणक, प्रिंटर, इंटरनेट, विज, पाणी, टेबल खुर्च्या यासह सर्वस सेवा असतांना हे कार्यालय वार्‍यावर सोडून डाटा एन्ट्री ऑपरेटर आणि पालक तांत्रीक अधिकारी फरार होतो. ते कुठे गेले याचा थांगपत्ता कुणालाच नसतो. पंचायत समिती कार्यालयाचे कक्ष अधिकारी किंवा गटविकास अधिकारी यांना देखील हे ऑपरेटर कुठे गेले याची माहिती नसते ही शोकांतीका आहे.
* तक्रार प्राप्त झाल्यास कारवाई करणार – प्रताप सवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी
सर्वसामान्य जनतेची आडवणूक होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत. जर एखादा कर्मचारी सर्वसामान्यांची आडवणूक करीत असेल, नागरीकांना त्रास देत असेल, कार्यालयात थांबत नसेल तर अशा कर्मचार्‍यांवर कारवाई प्रस्तावित केली जाईल. एखाद्याने तक्रार दाखल केली तर आम्ही अशा कामचुकार कर्मचार्‍यांवर नक्की कारवाई करु, यापुढे कोणाचीही आडवणूक होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे यांनी दैनिक मराठवाडा केसरी सोबत बोलतांना सांगीतले.

https://indianfast.com/

https://indianfast.com/

* आम्ही नोटीस दिली – कक्ष अधिकारी
जालना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि कक्ष अधिकारी यांच्या समोरच रोहयोचा कक्ष आहे. या कक्षात स्वतंत्र्य सीसीटीव्ही असून त्याचे लाईव्ह प्रक्षेपण थेट गटविकास अधिकारी यांच्या दालनात असून ते अगदी समोरच आहे. तरीही या सर्वांच्या हातावर तुरी देत रोहयो कक्षातील कर्मचारी फरार होत असल्याने आश्वार्य व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात कक्ष अधिकारी यांना विचारले असता रोहयोचा ऑपरेटर कार्यालयात थांबत नाही. त्यांना अनेकवेळा सुचना दिल्या आहेत. अनेजन त्यांच्या संदर्भात तक्रारी करतात. त्यामुळे आम्ही मागील आठवड्यातच नोटीस दिली आहे. असे जालना पंचायत समितीचे कक्ष अधिकारी यांनी दैनिक मराठवाडा केसरी सोबत बोलतांना सांगीतले.
* रोहयाचे मणुष्यबळ आता युनीटीकडून
रोहयोच्या कामाच्या नियोजनासाठी पुर्वी जिल्हा स्तरावर मणुष्यबळ उपलब्ध करुन घेतले जात होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील रोहयो विभागातुन ऑपरेटर आणि इतर कर्मचार्‍यांचे वेतन अदा केले जात होते. त्यामुळे त्यांच्यावर जिल्हा स्तरावर नियंत्रण ठेवता येत होते. परंतु मागील 4 महिन्यांपासून हे सर्व कर्मचारी युनीटी या कंपनीकडे वर्ग करण्यात आले असून त्यांचे वेतन आता युनीटी कंपनीकडून केले जात आहे. त्यामुळे या रोहयोच्या कर्मचार्‍यांवरचे नियंत्रण जिल्हा स्तरावर राहिले नाही. त्यामुळे याचा परिणात रोहयोच्या कामावर होणार असून मजुरांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *