ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

रोटरी क्लबऑफ कणकवली सेंट्रल मार्फत दिवाळी निमित्त फोंडाघाट मध्ये महिलांसाठी  ‘दिवाळीचा आरोग्यदायी फराळ’ या विषयावर पाककला स्पर्धा संपन्न

November 3, 202116:25 PM 76 0 0

सिंधुदुर्ग  (संपदा बागी-देशमुख) : रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल आणि तालुका न्याय व विधी सेवा समिती कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने *मुलींच्या संसारात आई-वडिलांचा हस्तक्षेप* या विषयावर महिलांचे अधिकार व कायदा याबाबत एक विशेष चर्चासत्र आयोजित करून फोंडा घाट येथे महिलांचे प्रबोधन केले यानिमित्ताने खास महिलांसाठी दीपावलीनिमित्त *दिवाळीचा आरोग्यदायी फराळ* या विषयावर पाककला स्पर्धेचे आयोजन केले होते .फोंडाघाट परिसरातील 40 महिला या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या होत्या .

या कार्यक्रमासाठी रोटरी क्लबचे प्रेसिडेंट डॉ. विद्याधर तायशेटे अ‍ॅड. दीपक अंधारी अ‍ॅड.रईस पटेल अ‍ॅड. रेखा सावंत रो. सौ. मेघा गांगण यांनी महिलांचे अधिकार व कायदा याबाबत उत्कृष्ट मार्गदर्शन व चर्चा केली कार्यक्रमप्रसंगी माजी सभापती तथा पंचायत समिती कणकवली सदस्या  सौ.सुजाता हळदीवे ,सौ. संजना आग्रे, सौ. मनस्वी दळवी डॉ. हेमा तायशेटे  श्री. दिलीप पारकर रो. दीपक बेलवलकर  रो.महेंद्र मुरकर रो. लवू पिळणकर रो. जगदीश राणे रो. दिशा अंधारी, रो. तृप्ती कांबळे, रो. माधवी मुरकर आदी  रोटरी सदस्य उपस्थित होते .परीक्षक म्हणून सौ. वसुधा माने कणकवली आणि शरद पाटकर कणकवली यांनी काम पाहिले पाककला स्पर्धेमध्ये सौ. रुपाली सचिन नाकाडे प्रथम ,सौ. रसिका दिनकर सापळे द्वितीय ,सौ.भाग्यलक्ष्मी राजन पेडणेकर तृतीय, तर उत्तेजनार्थ.सौ.ऋतुजा वैभवी मधली ,  सौ.वैभवी सूर्यकांत कदम ,  यांना प्राप्त झाले सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या य उपस्थितितीत बक्षीस देऊन गौरविण्यात आले सर्व सहभागी महिलांनाही भेटवस्तू देण्यात आल्या सर्व कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचलन रोटेरियन  श्री. जगदीश राणे आणि सौ. स्नेहलता राणे   यांनी केले प्रेसिडेंट डॉक्टर विद्याधर तायशेटे यांनी सर्व यशस्वी स्पर्धक आणि सहभागी स्पर्धकांचे रोटरी क्लब ऑफ कणकवली च्या वतीने  अभिनंदन केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *