ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

रोटरी मिड टाउन चा उपक्रम : पोलीस प्रशिक्षणार्थ्यांशी साधला संवाद। स्वतःला जिंकण्यासाठी सूक्ष्म कौशल्ये विकसित करा : अंजली धानोरकर

October 26, 202114:24 PM 51 0 0

जालना ( प्रतिनिधी) : प्रत्येक जण केवळ तांत्रिक कौशल्य विकसित करण्याच्या मागे धावतोय, नोकरी मिळवण्यासाठी त्याची आवश्यकता असली तरी मिळवलेली नोकरी टिकावी, ताण- तणावाचे व्यवस्थापन व्हावे, अधिकची कामे करण्यास ऊर्जा मिळाली तरच मनस्थिती स्थिर राहून स्वतः चे जग जिंकता येईल.यासाठी सूक्ष्म कौशल्य विकसित करण्यास प्राधान्य द्यावे .असा सल्ला औरंगाबादच्या उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांनी आज येथे बोलताना दिला. रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाउन तर्फे सोमवारी ( ता. 25) पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणार्थ्यांसाठी रोटरी चे प्रांतपाल रो. ओम प्रकाश मोतीपवळे यांच्या प्रेरणेतून ” कौशल्य विकास कार्यशाळा ” घेण्यात आली.या कार्यशाळेत अंजली धानोरकर यांनी प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद साधला. रोटरी मिडटाउन चे अध्यक्ष रो. ॲड. महेश धन्नावत, सचिव रो. प्रशांत बागडी, प्राचार्य अभय डोंगरे, रोटरी चे अध्यक्ष रो. महेंद्र बागडी, स्मिता चेचानी, उपप्राचार्य संजय कायटे, लेफ्टनंट निधी शुक्ला, पो. नि. मेहेञे, पो. नि. प्रविणा यादव, ॲड अश्विनी धन्नावत, ॲड. युवराज भारूका यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांनी तांत्रिक आणि सूक्ष्म कौशल्य यांच्यातील फरक स्पष्ट करताना विविध उदाहरणांचा संदर्भ देत प्रतिकूल तथा विपरीत परिस्थितीत मन आणि भावना यावर संयम ठेवून काळानुरूप परिवर्तित कसे करायचे याबाबत सविस्तर माहिती दिली. अंजली धानोरकर म्हणाल्या, कुठल्याही क्षेत्रात करियर करत असताना तांत्रिक कौशल्य अर्थात पदव्या तसेच नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक असलेली पात्रता ह्यांचा संपूर्ण जीवनामध्ये केवळ 15 टक्केच उपयोग होतो. तर मिळालेली नोकरी, प्रतिष्ठा, कामाचा वाढलेला व्याप आणि कुटुंब यांचा समतोल साधताना तसेच गृहिणी महिलांना सुद्धा कुटुंबाचा गाडा सुरळीत हाकण्यासाठी 85 टक्के सूक्ष्म कौशल्यांची आवश्यकता किती उपयोगी पडते हे त्यांनी युद्धभूमीवर पालथा पडूनही युद्ध जिंकणारा नेपोलियन बोनापार्ट, हिट मी डॉल अशा संदर्भाद्वारे स्पष्ट केले.
कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी संवाद कौशल्य, आपले म्हणणे पटवून देण्याची क्षमता, नवीन व्यक्ती जोडने, वेळेचे व्यवस्थापन आणि कुटुंबातील संवाद ही कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे असल्याचे अंजली धानोरकर यांनी नमूद केले. प्रत्येकाने स्वतःमधील कमतरतांचा शोध घेऊन त्यांना शक्तीत परिवर्तित करावे आणि चांगली कौशल्ये अधिक विकसित करण्यासाठी प्रयत्न केले तर कुठले क्षेत्र आपल्यासाठी अवघड ठरणार नाही. असा सल्ला शेवटी अंजली धानोरकर यांनी दिला.
सूत्रसंचालन पो. नि. प्रविणा यादव यांनी केले तर सचिव रो. प्रशांत बागडी यांनी आभार मानले. कार्यशाळेस पोलीस केंद्रातील प्रशिक्षणार्थी तसेच एनसीसीच्या प्रशिक्षणार्थींनी उपस्थित होत्या.
कायदा व सुव्यवस्थे साठी सहाय्यभूत : रो अॅड. महेश धन्नावत
कायदा व सुव्यवस्था अबाधित राहताना पोलिसांना स्वतःचे आरोग्य कुटुंब याकडे दुर्लक्ष होते. समूहाचे मानसशास्त्र कळावे कामाचा ताण कमी वाटावा नौकरी व कुटुंब यात समन्वय ठेवण्यासाठी प्रशिक्षणार्थींना माहिती व्हावी यासाठी कार्यशाळा सहाय्यभूत ठरेल असा विश्वास रोटरी मिड टाउन चे अध्यक्ष रो. ॲड. महेश धन्नावत यांनी यावेळी व्यक्त केला.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *