ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

रोटरी मिडटाउन व पोलीस प्रशासना तर्फे गणेशोत्सवात रक्तदानाचा महासंकल्प; मंडळांनी सक्रीय सहभाग नोंदवावा : रो. महेश धन्नावत

September 12, 202112:44 PM 17 0 0

जालना ( प्रतिनिधी) : विघ्नहर्ता गणराया सर्वत्र विराजमान झाला. गणेशोत्सवाचे औचित्य साधून सध्या सर्वत्र निर्माण झालेल्या रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाउन ने पोलीस प्रशासनाच्या सहकार्यातून रक्तदानाचा महा संकल्प केला असून शहरासह जिल्ह्यातील गणेश मंडळांनी या मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदवावा. असे आवाहन रोटरी मीड टाऊन चे अध्यक्ष रो. महेश धन्नावत यांनी केले आहे.

या विषयी माहिती देता़ंना रो .महेश धन्नावत म्हणाले, समाज प्रबोधन, एकता यांचे प्रतीक म्हणून गणेशोत्सव साजरा केला जातो. सध्या डेंग्यू, चिकनगुनिया, ताप अशा साथरोगांचा फैलाव होत आहे. या पार्श्वभूमीवर रोटरी मिडटाउन ने रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे, जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, रोटरीचे प्रांतपाल रो.ओमप्रकाश मोतीपवळे, उपप्रांतपाल रो.डॉ.सुमित्रा गादिया यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदानाचा महासंकल्प केला असून जालना शहरासह जिल्हा भरातील गणेश मंडळांनी नियमांचे पालन करून मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरे आयोजित करावी, सर्वाधिक रक्तदान करणाऱी गणेश मंडळे, सामाजिक संस्था यांचा विशेष सन्मान केला जाईल. असे सांगून रो महेश धन्नावत म्हणाले, एक प्रभाग एक गणेश मंडळ असलेल्या नगरसेवक व मंडळ पदाधिकारी यांचा ही गौरव केला जाणार असून अधिक माहिती साठी सचिव रो. प्रशांत बागडी 9823380090 यांच्या शी संपर्क साधावा आणि रक्तदानाच्या महासंकल्पात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा.असे आवाहन रोटरी मिडटाउन चे अध्यक्ष रो .महेश धन्नावत, सचिव रो. प्रशांत बागडी, प्रकल्प प्रमुख रो. प्रणय अग्रवाल, रो. रोमीत भक्कड यांनी केले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *