जालना प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाऊन चे संस्थापक अध्यक्ष श्री पंकज पाटणी व रोटरी क्लबचे अन्य सदस्य हे जुना जालना येथील प्रख्यात दिगंबर जैन मंदिर ट्रस्टच्या पदाधिकारी म्हणून निवडून आले असल्याने त्यांचा सत्कारक क्लबच्यावतीने ठेवण्यात आला होता.
या समारंभात दिगंबर जैन मंदिरच्या अध्यक्षपदी पंकज पाटणी, उपाध्यक्ष नितीन पाटणी, सचिव प्रणय पहाडे, सदस्य योगेश पाटणी व दिपेश पाटणी यांची निवड झाल्याबद्दल क्लबचे अध्यक्ष अॅड. महेश धन्नावत, सचिव प्रशांत बागडी, रोटरी क्लब ऑफ जालनाचे माजी अध्यक्ष श्री दिनेश छाजेड, माजी अध्यक्ष सुरज गेही, अलोक नानावटी, मधुर भंडारी, गौरव मोदी, माजी सचिव प्रतिक नानावटी, रोमीत भक्कड, माजी सचिव दिपांक अग्रवाल, मधु राठी, अनुप जाजु, दिपक गेही, अनुज बगडिया ईत्यादी उपस्थित होते. याप्रसंगी आयकॉन कंपनीने त्यांच्या जाहिरातीसाठी अमिताभ बच्चन यांच्या सोबत करार केल्याने श्री मधु राठी यांचा सुध्दा सत्कार करण्यात आला. श्री पंकज पाटणी यांनी सांगितले की, श्री दिगंबर जैन मंदिर हे १०० वर्षा पेक्षा जास्त ने असुन तिथे जी मुर्ती आहे, ती सुध्दा ४०० वर्ष जुनी असुन जैन समाजात या मंदीराचे इत्व आहे. येथे अनेक संतांनी निवास केल्याने येथील भुमी पावन झालेली आहे. ॲड. महेश धन्नावत यांनी सांगितले की, सदस्यांच्या यशात क्लबचे यश असते तर भार प्रदर्शन सचिव प्रशांत बागडी यांनी केले.
Leave a Reply