ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

रोटरी मिडटाऊन सदस्यांचा सदस्यांचा सत्कार

December 6, 202115:40 PM 67 0 0

रोटरी क्लब जालना मिडटाउन चे संस्थापक अध्यक्ष श्री पंकज पाटणी यांची सिविल क्लब जालना सचिवपदी निवड झाल्याबद्दल व संस्थापक श्री मनमोहन भक्कड हे रोटरी क्लबचे असिस्टंट गव्हर्नर या पदी नियुक्त झाल्याबद्दल यांचा क्लबच्यावतीने सत्कार करण्यात आला यावेळी रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाऊन चे अध्यक्ष एडवोकेट महेश धनावत, मुकेश पाटणी, सागर दक्षिणी, अनुप जाजू, योगेश पाटणी, गौरव मोदी, डॉक्टर प्रतिक लाहोटी व सदस्यांची उपस्थिती होती.

सीए आकाश मुंदडा यांना विधी शाखेतील पदवी मिळाल्याबद्दल त्यांचासुद्धा सत्कार करण्यात आला होता. पंकज पाटणी यांनी प्रतिपादन केले की, आज जालना शहरात विकास होत आहे मात्र नागरिकांनी दक्षता घेऊन त्यांचे कर्तव्य पार पाडावे जसे रोडचे बांधकाम व क्युरिंग होत असताना त्यावर वाहन नेण्यात येऊ नाही तसेच शक्य झाल्यास आपल्या घरासमोरील रोडवर क्युरिंग साठी पाण्याची गरज असेल तर ते कार्य करावे तसेच क्लबच्या वतीने नागरिक कर्तव्य जन जागृती अभियान चे कौतुक केले तसेच क्लबच्यावतीने पहिला उपप्रांतपाल म्हणून मनमोहन बक्कड यांची निवड झाल्याने क्लब ची जबाबदारी वाढली आहे असे नमूद सुद्धा केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *