ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

प्रियकराला मिळवण्यासाठी मोजले तब्बल दीड कोटी रुपये

January 6, 202113:49 PM 94 0 0

प्रेम अनमोल असतं आणि प्रेमाची काही किंमत नसते असं म्हटलं जातं. पण, मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये हे सर्व खोटं ठरलंय. खरंतर ‘पती, पत्नी आणि वो’ची ही प्रेमकहाणी बॉलिवूडचा गाजलेला सिनेमा ‘जुदाई’ची आठवण देणारी आहे. भोपाळमध्ये एका महिलेने आपल्या विवाहित प्रियकराला मिळवण्यासाठी त्याच्या पत्नीला जवळपास दीड कोटी रुपये दिलेत. भोपाळच्या कुटुंब न्यायालयात हा तोडगा काढण्यात आला. ५४ वर्षांच्या एका महिलेच्या पतीचं निधन झालं, त्यानंतर ती तिच्यापेक्षा १२ वर्षांनी लहान असलेल्या इसमाच्या प्रेमात पडली. त्याचं आधीच लग्न झालं असून पत्नी व दोन अल्पवयीन मुली आहेत.

दोघंही एकाच ऑफिसमध्ये काम करायचे. काही काळानंतर दोघांच्या नात्याबद्दल त्याच्या पत्नीला आणि मुलींना समजलं. त्यामुळे घरात वाद होण्यास सुरूवात झाली. आई -वडिलांमध्ये दररोज कडाक्याचं भांडण होत असल्याने अखेर त्या इसमाच्या मुलींनी कुटुंब न्यायालयात तक्रार केली. तक्रारीनंतर कुटुंब न्यायालयाने पती-पत्नीला समुपदेशनासाठी बोलावलं. त्यावेळी पतीने दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडल्याचं मान्य केलं, तसंच पत्नीसोबत राहण्यास नकार दिला. दोन वेळेस समुपदेशन केल्यानंतरही पती पत्नीसोबत राहण्यास तयार नव्हता. अखेर पत्नीने आपल्या पतीला सोडायची अर्थात घटस्फोटाची तयारी दाखवली. पण यासाठी तिने पतीच्या प्रेयसीसमोर एक अट ठेवली. आपल्या अल्पवयीन मुलींच्या भविष्यासाठी पतीच्या प्रेयसीने तिचं ड्युप्लेक्स घर आणि २७ लाख रुपये द्यावे अशी मागणी तिने केली.

अखेर प्रियकराला मिळवण्यासाठी त्या महिलेने प्रियकराच्या पत्नीला १५०० स्क्वेअर फूटचं ड्युप्लेक्स घर आणि २७ लाख रुपये रोख दिले. म्हणजेच आपलं प्रेम मिळवण्यासाठी तिने तब्बल दीड कोटी रुपये मोजले. लग्नाच्या इतक्या वर्षांनी फसवणूक केल्यामुळे पत्नीलाही त्याच्यासोबत राहायचं नव्हतं, पण दोन अल्पवयीन मुली असल्याने त्यांच्या भविष्यासाठी तिने हा निर्णय घेतला. या अनोख्या तोडग्यानंतर अखेर पती-पत्नीचं १८ वर्षांचं नातं तुटलं आणि पती प्रेयसीसोबत निघून गेला.

Categories: राष्ट्रीय
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *