ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

बदनापुर येथील शासकीय आरोग्य रूग्णालयासाठी आमदार मनिषाताई कायंदे यांच्या स्थानिक विकास निधी मधून रूग्णवाहिकेसाठी 20 लक्ष रूपये मंजूर युवासेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यांच्या प्रयत्नाला यश

July 9, 202112:35 PM 7 0 0

जालना । प्रतिनिधी – कोरोना महामारीचा प्रभाव जालना जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात होता. बदनापुर तालुक्यातील रूग्णांना तालुक्याच्या ठिकाणहून जिल्ह्याच्या ठिकाणी व संभाजीनगर येथे उपचारासाठी सतत पाठवावे लागत होते. बदनापुर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून जालना-संभाजीनगर हायवेवर आहे. येथे ग्रामीण भागातील 80 गावातील जनतेची ये-जा असते.

जालना-संभाजीनगर मुख्य मार्ग असल्यामुळे येथे सतत अपघात होत असतात. त्यामुळे रूग्णांना वेळेवर उपचार मिळण्यासाठी एका रूग्णवाहिकेची आवश्यकता होती. यासाठी युवासेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे व महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सविताताई किवंडे यांनी शिवसेनेच्या विधान परिषद सदस्य आमदार प्रा.डॉ.मनिषाताई कायंदे यांच्याकडे बदनापुर तालुक्यातील जनतेच्या आरोग्य सेवेसाठी सुसज्ज अशा रूग्ण वाहिकेसाठी निधीची मागणी केली. त्याला आमदार मनिषाताई कायंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून बदनापुर येथील शासकीय आरोग्य रूग्णालय रूग्ण वाहिकेसाठी 20 लक्ष रूपयांचा निधी मंजूर केला आहे. तसे पत्र ही त्यांनी जिल्हाधिकारी जालना यांना पाठविलेले आहे. या कामासाठी युवासेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी सततचा पाठपुरवठा केला व येत्या 27 जुलै 2021 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त प्राप्त रूग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती भाऊसाहेब घुगे यांनी दिली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *