जालना, दि. ३०(प्रतिनिधी)-नाबार्ड व जिजामाता लोकसंचालित साधन केंद्राच्या संयुक्त उपक्रम महिला आर्थिक विकास महामंडळ जालना अंतर्गत जिल्ह्यात जवळपास तीन हजार १४५ बचत गटाची स्थापना करण्यात आली आहे. या बचत गटांना विविध प्रकारचे प्रशिक्षण आणि उद्योग करण्याकरिता मार्गदर्शन करण्यात येते तसेच शासनाच्या विविध विभागाच्या माध्यमातून कृती संगम करून त्या योजनांचा लाभ बचत गटांना देण्यात येत आहे. नाबार्ड मार्फत राबविण्यात येत असलेल्या रुरल मार्ट करिता माविम मार्फत परतूर व अंबड करिता प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
सदर प्रस्ताव मंजूर होऊन अंबड शहरात अण्णाभाऊ साठे चौकात रुरल मार्ट सुरू करण्यात आले आहे. या रुरल मार्ट मध्ये अंबड व घनसावंगी तालुक्यातील विविध बचत गटांनी उत्पादित केलेला माल विक्री करता ठेवण्यात आला आहे. ग्रामीण भागाची भागाची चव व उत्तम गुणवत्ता असलेले उत्पादन अंबडच्या नागरिकांकरिता या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. नाबार्ड मार्फत दर तीन महिन्यांनी या रुरल मार्ट चा आढावा घेण्यात येतो जून अखेर समाप्त होणाNया तिमाहीचा आढावा ३० जून २०२१ रोजी घेण्यात आला. या बैठकी प्रसंगी नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक तेजल क्षीरसागर, जालना अॅग्रणी बँक व्यवस्थापक मोघे, जिल्हा समन्वय अधिकारी उमेश कहाते, जिल्हा उपजीविका सल्लागार प्रवीण कथे तसेच जिजामाता लोकसंचालित साधन केंद्राच्या व्यवस्थापक नीता कोठोडे उपस्थित होत्या. या रुरल मार्ट मध्ये मास्क, कापडी पिशवी, हॅन्ड वॉश, फिनाईल विविध लोणचे, एलईडी लाईट, शोभेच्या वस्तू, विविध मसाले, पापड, विविध प्रकारच्या डाळी तसेच सर्व प्रकारचे पीठ विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहे. या बैठकीत fिजल्हा समन्वय अधिकारी उमेश कहाते यांनी सांगितले की, बचत गटांच्या उत्पादन विक्री करिता रुरल मार्ट उत्तम पर्याय आहे. ज्याद्वारे बचत गटातील महिलांना त्यांच्या उद्योगात उत्पन्न मिळेल. सदर बैठक यशस्वी करण्याकरता क्षेत्रीय समन्वयक सुनिता घाडगे, वाय. सी. एम. आर. सी. स्टाफ यांनी परिश्रम घेतले.
Leave a Reply