ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जगभरातील हिंदूंनी हिंदु धर्माची योग्य तात्त्विक भूमिका मांडल्यामुळे ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ परिषद विफल ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

September 17, 202113:31 PM 8 0 0

अमेरिकेत आयोजित केलेल्या ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या परिषदेमध्ये तथाकथित अभ्यासकांनी हिंदु धर्मातील वर्ण, जातीव्यवस्था आदींविषयी संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. धर्मांतराच्या हेतुने ब्रिटिश मिशनर्‍यांनी ब्राह्मणवादाला जन्म दिला आणि त्याला पुढे नेण्याचे काम अशा हिंदुविरोधी परिषदा करत आहेत. ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ परिषद आयोजित करण्यापूर्वी आयोजकांनी हिंदु धर्माविषयी विविध भ्रम पसरवून वारंवार आपल्या भूमिका बदलल्या. असे खोटे पसरविणार्‍यांवर विश्‍वास न ठेवता जगभरातील हिंदु बांधवांनी हिंदु धर्माचा प्रसार मोठ्या प्रमाणात करायला हवा. जगभरातील हिंदूंनी हिंदु धर्माची योग्य तात्त्विक भूमिका मांडल्यामुळे, तसेच हिंदूंचा हजारो वर्षांचा मानवतेचा आणि विश्‍वाला पूरक असा इतिहास समाजाला सांगितल्यामुळे अमेरिकेत झालेली ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ परिषद विफल झाली, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्र्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले. हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ परिषदेमध्ये हिंदुविरोधी प्रचार !’ या ऑनलाईन विशेष संवादात ते बोलत होते.

‘इशित्व फाऊंडेशन’च्या संचालिका आरती अगरवाल या वेळी म्हणाल्या की, या हिंदुविरोधी परिषदेतून ‘हिंदुत्वा’चे असे चुकीचे चित्रण निर्माण करायचे होते की, हिंदूंचा इतिहासातील नरसंहार योग्यच होता, तसेच पुढे होणारा नरसंहारही योग्यच असेल. सध्या पाकिस्तान आणि बांगलादेश यांमध्ये हिंदू युवतींवर अत्याचार होत आहेत. हिंदूंची गावे, वस्त्या जाळल्या जात आहेत. हिंदूंना कितीही लक्ष्य केले, तरी मानवाधिकारवाले त्याकडे लक्ष देणार नाहीत, अशी स्थिती यांना निर्माण करायची आहे. मनोचिकित्सक आणि लेखक डॉ. रजत मित्रा या वेळी म्हणाले की, या हिंदुविरोधी परिषदेमधून केवळ हिंदुविरोधी बाजू मांडून ते ‘वास्तव’ म्हणून पुढे रेटण्याचा प्रयत्न केला गेला. वेगवेगळ्या विद्यापिठांनी एकत्र येऊन हिंदु धर्माला एक धोका मानून हिंदूंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. विदेशात आपले अनेक हिंदु युवा शिक्षण घेत आहेत. ‘हिंदूंनी संघर्ष करून विविध आक्रमणांपासून हिंदु धर्माला कसे वाचवले’, या इतिहासाची व्यापक स्वरूपात शिकवण हिंदु युवापिढीला दिली पाहिजे, तसेच हिंदु धर्माप्रती आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली पाहिजे. ऑस्ट्रेलिया येथील विचारवंत डॉ. यदु सिंह म्हणाले की, ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या परिषदेचे आयोजक आणि वक्ते हे केवळ हिंदु धर्मविरोधी नाही, तर नक्षलवाद्यांना पाठिंबा देणारे, भारतीय सैन्याच्या विरोधात बोलणारे देशविरोधी आहेत. या परिषदेला जगभरातील हिंदूंनी सोशल मीडियासह अन्य माध्यमांतून प्रतिकार केल्यामुळे त्यांचा उद्देश सफल झाला नाही.

आपला नम्र,
श्री. रमेश शिंदे,
राष्ट्र्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती,
(संपर्क : 99879 66666)

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *