जगभरात दर वर्षी अनुमाने 8 लक्ष व्यक्ती आत्महत्या करतात, म्हणजे दर 40 सेकंदाला 1 व्यक्ती ! यातील बहुतांश व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी असल्याने त्यांचा मृत्यु अत्यंत दुर्दैवी आहे. व्यक्तीची तणावाचा सामना करण्याची क्षमता तिच्यातील मानसिक ऊर्जेवर अवलंबून असते. एखाद्या व्यक्तीमध्ये स्वभावदोष जास्त असतील, तसेच पूर्वायुष्यातील अप्रिय घटनांचा मनावर ताण असेल, तर मनाची ऊर्जा अल्प असते. अनेक समस्यांमागील मूलभूत कारण आध्यात्मिक असते, उदा. प्रारब्ध. अतृप्त पूर्वज आणि सूक्ष्मातील वाईट शक्ती याही व्यक्तींना त्रास देतात आणि त्यांचे स्वभावदोष आणि पूर्वजन्मांतील देवाण-घेवाण यांच्या आधारे त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करतात. या सर्वांवर मात करण्यासाठी व्यक्तीने साधना आणि स्वभावदोष निर्मूलन प्रकिया केल्यास आत्महत्या टळू शकतात, असे प्रतिपादन ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे श्री. शॉन क्लार्क यांनी केले. दी सेवन्थ इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन पब्लिक हेल्थ, श्रीलंका (The 7th International Conference on Public Health (ICOPH 2021), Sri Lanka) या आंतरराष्ट्रीय परिषदमध्ये शोधनिबंध सादर करतांना ते बोलत होते. ही परिषद ‘दी इंटरनॅशनल इंस्टिट्यूट ऑफ नॉलेज मॅनेजमेंट, श्रीलंका (The International Institute of Knowledge Management (TIIKM), Sri Lanka) यांनी आयोजित केली होती
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले हे शोधनिबंधाचे लेखक, तर श्री. शॉन क्लार्क हे सहलेखक आहेत. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने वैज्ञानिक परिषदांमध्ये सादर केलेले हे 77 वे सादरीकरण होते. यापूर्वी विश्वविद्यालयाने 15 राष्ट्रीय आणि 61 आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. यांपैकी 5 आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये विश्वविद्यालयाला ‘सर्वोत्कृष्ठ शोधनिबंध’ पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
श्री. शॉन क्लार्क यांनी तणाव आणि आत्महत्या यांच्या संदर्भात केलेल्या आध्यात्मिक संशोधन, व्यक्तीने आत्महत्या करण्यामागील मूलभूत कारणे आणि त्यांवरील उपाय आदी महत्त्वाची सूत्रे या वेळी स्पष्ट केली. आत्महत्या रोखण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांचे सार मांडतांना श्री. शॉन क्लार्क यांनी सांगितले की, नामजप ही अत्यंत सोपी; परंतु उपयुक्त अशी आध्यात्मिक साधना आहे. नामजपामुळे व्यक्तीमध्ये स्वभावदोष-निर्मूलनासाठी आवश्यक ती ऊर्जा निर्माण होते. ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ हा सध्याच्या काळासाठी अत्यंत उपयुक्त असा नामजप असल्याचे संशोधनात आढळले आहे. तसेच ‘श्री गुरुदेव दत्त’ हा जप पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण करतो. यासह स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेद्वारे आपल्या मनातील स्वभावदोषांवर मात करणे सोपे जाते. मानसिक आरोग्याच्या अंतर्गत ‘वृद्धी आणि प्रतिबंध’ यांसाठी व्यक्तींनी वरील सूत्रांचा अंगिकार केल्यास आत्महत्येचे प्रमाण घटण्यात नक्कीच मदत होईल.
Leave a Reply