ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

वरुड मोर्शी तालुक्यातील सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे साकडे

August 30, 202114:40 PM 77 0 0

वरुड तालुका प्रतिनिधी : मोशी विधानसभा मतदार संघाती प्रलंबीत व अत्यंत आवश्यक असलेली विकास कामे पूर्ण होण्यासाठी संबधित मंत्री तसेच अधिकारी यांचे सोबत बैठक आयोजित करुन मोर्शी वरुड तालुक्यातील विकास कामांना मान्यता प्रदान करुन निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रत्यक्ष भेटून केली आहे.
मोर्शी विधानसभा मतदार संघ विकासापासुन अत्यंत मागासलेला असून वरुड व मोर्शी तालुका हे अतिशोषीत तालुके आहेत. त्यामुळे सिचन प्रकल्प, संत्रा फळ पिकाची लागवड प्रचंड प्रमाणात झाली असून शेतक-यांचे जिवनमान त्यावर अवलंबुन आहे त्यासाठी संत्रा प्रकल्प, सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी औद्योगीक विकास, पर्यटन स्थळांचा विकास, धार्मीक स्थळांचा विकास, तसेच नागरी सुविधा, इत्यादी कामे होणे अत्यंत आवश्यक असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिले.


वरुड मोर्शी तालुक्याचा नळगंगा ते वैनगंगा नदिजोड प्रकल्पात समावेश करण्यात यावा. कन्हान ते वर्धा नदिजोड प्रकल्प राबवुन अतिशोषीत वरुड व मोशी तालुक्याचा समावेश करण्यास मंजुरी प्रदान करण्यात यावी. लखारा लघु सिंचन प्रकल्पास विशेष बाब म्हणुन प्रशासकीय मंजुरी प्रदान करुन निधी उपलब्ध करुन देण्यात यावा. वरुड मोर्शी तालुक्यातील शेकदरी सिंचन प्रकल्प, त्रिवेणी सिंचन प्रकल्प, दाभेरी सिंचन प्रकल्पास बंदिस्त वितरण प्रणालीस (पि.डी.एन) मंजुरी प्रदान करण्यात यावी.

अप्पर वर्धा सिंचन प्रकल्पाची सिंचन क्षमता वाढविणेसाठी पंढरी सिंचन प्रकल्प, नागठाणा सिंचन प्रकल्प, पाक सिंचन प्रकल्प, शेकदरी सिंचन प्रकल्प, त्रिवेणी सिंचन प्रकल्प, दाभी सिंचन प्रकल्प, बारुड सिंचन प्रकल्प, प्रकल्पाची पाणी साठवण क्षमतेचा परिसर वाढविणे. चिंचोली गवळी, आमपेंड येथे सिंचन प्रकल्पाचे बांधकाम करुन नविन सिंचन प्रकल्पाची निर्मीती करणे.
वरुड मोर्शी तालुक्यातील प्रस्तावीत संत्रा प्रक्रीया प्रकल्पास तात्काळ मंजुरी प्रदान करणे. वरुड, मोर्शी तालुक्यात अनुसुचित जाती, जमातीची संख्या प्रचंड प्रमाणात असल्याने सहकारी सुतगिरणीस मंजुरी प्रदान करुन निधी उपलब्ध करुन देणे. वरुड व मोर्शी येथील औद्योगीक क्षेत्रात कृषी आधारीत औद्योगीक प्रक्रीया उद्योगास मंजुरी प्रदान करणे, गोविंदप्रभु चक्रधर स्वामी श्री क्षेत्र रिध्दपुर ता.मोशी येथे महानुभाव पंथीय मंदीराचा व परीसराचा विकास करण्यासाठी रुपये ४०० कोटीचे विकास आराखड्या तरतुद करणे. वरुड मोर्शी तालुक्यातील “ब” वर्ग तिर्थक्षेत्राचा विकास करणेसाठी प्रत्येकी रुपये २५.०० कोटीची तरतुद करणे. दादाजी धुनिवाले दरबार लिंगा येथे पर्यटन विकास करुन रोजगार निर्मीती करणेस्तव मंजुरी प्रदान करुन प्रत्येकी रुपये ३०.०० कोटी निधी मंजुरी देणे.
मोर्शी येथे नविन आदिवासी विकास विभाग कार्यालयाची निर्मीती करणे. शेंदुरजनाघाट तसेच मोर्शी नगर परिषद दर्जा वाढ करुन ब दर्जास मंजुरी प्रदान करुन रस्ते विकास प्रकल्प प्रत्येक नगर परिषदेसाठी रुपये १०० कोटी या प्रमाणे रुपये ३०० कोटी ची तरतुद करण्याची विनंती आहे.
संत्रा, मोसंबी व इतर खरीपाचे पिकाचे गुणवत्ता चाचणी करणेसाठी माती, पाणी, फुले, पाणे परीक्षणासाठी नविन प्रयोगशाळेची फळ संशोधन केंद्राची निर्मीती करणे.
फळ पिकांचे नव नवीन जातीचे संशोधन करणेस्तव ता. वरुड येथे संशोधन केंद्राची स्थापना करण्यास निर्मीतीस मंजुरी प्रदान करणे. शामाप्रसाद मुखर्जी रुर्बन मिशनचा वरुड मोर्शी तालुक्याचा समावेश करणेत यावा. राज्य सरकारचे स्मार्ट तसेच मॅगनेटीक महाराष्ट्र योजने मध्ये वरुड, मोर्शी तालुक्यातील ॲग्रो प्रोड्युसर कंपनीला प्राधान्याने निधी उपलब्ध करुन देण्यात यावा. १९९१ चे पुरग्रस्तांचे पुनर्वसनाचा व तत्संबधित २८ गावांच्या मुलभुत सुविधेस तात्काळ मंजुरी प्रदान करुन तात्काळ निधी उपलब्ध करुन देण्यात यावा. वरुड मोर्शी तालुक्यात आदिवासी जनतेची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आदिवासी योजने अंतर्गत असलेल्या सर्व गावांचा पेसा कायद्यात समावेश करण्यात यावा मोर्शी विधानसभा मतदार संघाच्या विविध मागण्या पूर्णत्वास नेण्यासाठी संबधीत (विभागाचे) खात्याचे मंत्री व अधिकारी वर्ग यांचे सोबत बैठक आयोजीत करुन संबधितांना निर्देश देऊन अत्यावश्यक बाबींचा विचार करुन सर्व बाबीस मान्यता प्रदान करुन निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *