ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सकाळ समूह तनिष्का व्यासपीठ जिल्हा प्रमुख अभिषेक भोसले यांचे उत्तम मार्गदर्शन

October 4, 202113:06 PM 57 0 0

मुरूड जंजिरा ( प्रतिनिधी,सौ नैनिता कर्णिक) सकाळ समूह तनिष्का व्यासपीठ समन्वयक सौ नेहा पाके यांच्या निवासस्थानी सकाळ समूह तनिष्का व्यासपीठ जिल्हा प्रमुख अभिषेक भोसले यांच्या मार्गदर्शनासाठी बैठक आयोजित करण्यात आली.या वेळी तनिष्का सदस्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ ऊषा खोत,सौ नैनिता कर्णिक, उपसरपंच सौ मंदा ठाकुर, तसेच सौ करूणा पाटील,सौ मीना तांबडकर, सौ शीतल टाके, कु आराधना दांडेकर, यां उपस्थित होत्या. प्रथम नेहा पाके यांनी सर्व उपस्थिताचे शब्दसुमनाने स्वागत केले. अभिषेक भोसले यांनी म आपल्या मार्गदर्शनात सन २०१३ साली कोल्हापूर येथे श्री अंबाबाई मंदिर येथे गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारून सकाळ माध्यम समूह तनिष्का व्यासपीठ स्थापना केल्याचे सांगितले.


मुलगी झाली, प्रगती झाली.या उक्तीप्रमाणे आज बचतगट व तनिष्का व्यासपीठ यामुळे महिला सक्षमीकरण व सबलीकरण यात मोठी प्रगती झाली आहे. याच वेळी माझी वसुंधरा योजना या विषयावर माहिती दिली.याच प्रमाणे २ ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त नगरपालिका व ग्रामपंचायत ठिकाणीसमुद्र किनारा स्वच्छ करणे ,ओला व सुका कचरा वेगळा करणे, खत तयार करणे परसबाग उपक्रमाची माहिती लाकडी नेमप्लेट तयार करणे,खणसाडीपासून आकाश कंदील तयार करणे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमाची सखोल माहिती दिली.व या कार्यशाळेचे आयोजन ही कसे केले जाणार आहे हे ही प्रतिपादन केले.भोसले सर यांनी मार्गदर्शनात विचारलेल्या शंकांचे निरसन केले व ‌दिवाळीनंतर कार्यशाळा घेण्यात येणार असल्याचे सांगितले.मार्गदर्शन उत्तम केले. सौ ऊषा खोत यांनी मान. मार्गदर्शक अभिषेक भोसले सर यांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन केल्याबद्दल नमुद केले.सर्व उपस्थिताचे मनःपूर्वक आभार मानून कार्यक्रमांची सांगता केली

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *