दि. २१.०७.२०२१ रोजी उरण – पाले गावातील दिल्यांग श्री. रूपेश का. म्हात्रे यांना कोप्रोली ते पिरकोन दरम्यान प्रवास करित असतांना पैशांनी व कार्ड असलेली पॅाकेट( मनी पर्स ) सापडली.
सदर पॅाकेट उघडून पाहिले असतां त्यात रू. ८०००/- ( आठ हजार मात्र ) सह ड्रायव्हींग लायसन्स, पॅन कार्ड, ए.टी.एम. आदी ऐवज सापडले. तत्काल मनांत कोणताही संकोच न ठेवता रूपेश ह्याने व्हॅाटसॅप व मॅसेजच्या माध्यमातून ड्रायव्हींग लायसन्स प्रसिद्ध केले. काही मिनिटांच्या अवधीत उरण – आवरे येथील श्री. विशाल विष्णू गावंड ह्याने मोबाईल द्वारा संपर्क साधून पॅाकेट हरविल्याचे कळविले. श्री. रूपेश रा. म्हात्रे, मु. पाले यांच्या मुक्कामी येवून श्री. विशाल गावंड ( पिरकोन ) ह्यांना दस्ताऐवज व पैशांनी भरलेला पॅाकेट सुपूर्द करण्यात आला. दिव्यांग श्री. रूपेश म्हात्रे ह्यानी दाखविलेल्या प्रामाणिकपणाचे संपूर्ण उरण तालुक्यात कौतुक होत आहे.
Leave a Reply