ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

गोदावरी काठावर वसलेल्या सनातन काळातील देवस्थानाना तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळाचा दर्जा द्यावा

August 29, 202114:36 PM 74 0 0

नायगाव तालुक्यातील बरबडा येथील दिवंगत माधवराव उर्फ बालासाहेब मोहनराव धर्माधिकारी व दिवंगत ज्ञानोबाराव मोहनराव धर्माधिकारी यांच्या नावा रूपाने बरबडा हा गाव रावाच गाव म्हणून ओळख मराठवाड्यासह नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा असून रावाच गाव म्हणून ओळख असली तरी त्यांना मिळालेली धर्माधिकारी ही पदवी आद्यगुरु शंकराचार्य यांच्या कडून मिळाली असल्यामुळे त्याना धर्माधिकारी म्हणून ओळखल्या जाते बरबडा गावाची ग्रामपंचायत स्थापण झाली तेव्हा पहिले सरपंच कै. गोविंदराव ज्ञानोबाराव धर्माधिकारी विद्यमान बरबडा गावचे सरपंच होते.बरबडा गावाचा विकास त्यांच्या माध्यमातून भरपूर करण्यात आला होता. बरबडा गावातील रस्ते सीसी रोड, दोन्ही बाजूने नाल्या गावाला पाणी पिण्यासाठी दोन टाक्या तळ्यावर उभारण्यात आल्या एक पाण्याची टाकीं बरबडा गाववासियासाठी तर दुसरी टाकीं पाटोदा (त.ब) गाववासीयासाठी उभाराण्यात आली आहे © महाराष्ट्रासह नांदेड जिल्ह्यातील असलेल्या नायगाव तालुक्यात बरबडा नगरीचे वैभव दिवंगत राजकीय पुढाऱ्यामुळे प्रसिद्ध असले तरी या बरबडा गावालगत असलेल्या गोदावरीच्या पवित्र काठावर सनातन काळातील देवस्थान आहे सदर देवस्थानाचा अध्याप कोणत्या ही राजकीय पुढाऱ्यानी व गावातील लोकांनी पुढाकार घेऊन देवस्थान परिसराचा विकास साधण्यासाठी प्रयत्न केला नाही बरबडा येथील नागरिक प्रयत्नशिल असले तरी गोदावरीच्या पवित्र काठावर सनातन काळातील पवित्र गोदाकाठची उपेक्षित देवस्थाने पवित्र गोदाकाठच्या उपेक्षित देवस्थानांना विकासाची अपेक्षा आहे.पुण्य पवित्र भूमी गावाची ! लहान थोर सर्व देवांची !! गौरवशाली भावभक्तांची ! थोरवी वाचावी बरबड्याची!!गोदावरी आहे गावाजवळ ! पाणी वाहे तिचे झुळझुळ !! स्नान करण्याला किती निर्मळ! पाच देवांची पाच देऊळ !! दर्शन होते पाच धामांची ! थोरवी वाचावी बरबड्याची !!


@ नांदेड जिल्ह्यातील नायागांव तालुक्याच्या ठिकाणी बरबडा जिल्हा परिषद गट म्हणून जिल्ह्यात निवडणुकी दरम्यान चर्चेला जातो परंतु गेल्या कित्येक वर्षाची परंपरा जपत बरबडा गाववासी सनातन काळातील गोदावरी काठावरील महादेव मंदिर,दत्तात्रय मंदिर , बळीचे मंदिर,हनुमान मंदिर कपिलेश्वर मंदिर,खंडोबा मंदिर, नागोबा मंदिर, येताळेश्वर मंदिर, पोचेम्मा मंदिर, कृष्ण मंदिर,अशा पवित्र ठिकाणी जाऊन पूजा अर्चा करतात व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन मोठया प्रमाणात केले जातात परंतु सुंदर अशा निसर्गमय सानिद्यात असलेले देवस्थान विकास पासून वंचित आहे.तालुक्यातील बरबडा नगरीत हिंगोली जिल्ह्याचे खासदार हेमंत पाटील यांचे नुकतेच बरबडा येथे आगमन झाले होते त्यांचे धुमधडाक्यात जंगी स्वागत ही गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले.गोदावरी काठावर वसलेल्या सनातन काळातील देवस्थानाना तिर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ कार्यन्वित करण्यासाठी व दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे हिंगोली जिल्ह्याचे खासदार हेमंत पाटील यांनी नांदेड जिल्हयाचे उपजिल्हाप्रमुख गंगाधर बडूरे, दिलीपराव धर्माधिकारी, सरपंच माधवराव कोलगाने यांना ग्वाही दिली आणि अख गाव समाधान व्यक्त केले आहे. बरबडा गावाचे पुनर्वसन झाले असले तरी पुरातन काळातील देवस्थान असलेले महादेव मंदिर, कपिलेश्वर मंदिर, नृसिंह मंदिर, बळीचे मंदिर यांचा विकास झाला नाही यातील मूर्त्यांची फुलवाहून भाविक भक्तगण पूजा करतात पूजा करताना या देवस्थाचा विकास कधी होईल हीच अपेक्षा मंदिरात करतात. गोदावरीच्या पवित्र काठावर असलेले महादेवाचे भव्य मंदिर व बळीच्या मंदिरातील सुंदर मुर्त्या ही वैभवशाली मूर्ती असे वैभवाने नटलेले बरबडा नगरी यातून मोठया स्वरुपात फळाला आली असल्यामुळे या देवस्थानाच्या पवित्र ठिकाणी भावीक भक्तांची श्रावण महिन्यासह शिवरात्रीच्या महिन्यात मोठी गर्दी होत असते पवित्र गोदाकाठच्या देवस्थाना पर्यंत अजूून ही विकासाचे हात पोहचलेच नाहीत.
© महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले शिखर सिंगनापूर या ठिकाणी एकमेव महादेवाचे मंदिर, आणि बळीचे मंदिर असून त्यास तोडीसतोड नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील मौजे बरबडा येथील गोदावरी काठावर असे एक मंदिर म्हणजे महादेवाचे मंदिर व बळीचे मंदिर सुंदर व भव्य असल्यामुळे या ठिकाणी दरवर्षी श्रावण महिन्यात दर सोमवारी दर्शनासाठी गर्दी होत असतें व तसेच बार्शी अंबलीच्या दिवसी पूर्वी पासून महादेवाचे व बळीचे शुभमंगल होते महाप्रसादाचे आयोजन केल्या जाते तर शिवरात्रीच्या महिन्यात बरबडा येथे कपिलेविश्वर मंदिरात सात दिवस शिवनाम सप्ताह,पारायण, शिवपाठ, परमरहस्य ग्रंथ पारायण, शिवपाठ , कीर्तन, प्रवचन,असे विविध धार्मिक कार्यक्रमाचे गावकऱ्यांच्या वतीने आयोजन केले जातात तसेच येताळेश्वर मंदिर, हनुमान मंदीर, खटकाळी मारोती मंदिर व खंडोबा मंदिरात साप्ताहचे आयोजन केले जाते
© गोदावरी पात्राच्या पवित्र ठिकाणा पासून अगदी जवळच असलेल्या बरबडा गावातील एकंदरीत लोकसंख्या बारा हजाराच्या जवळ पास असल्यामुळे या गावातील वेगवेगळ्या धर्मातील बांधव एककोप्याने एकत्र नांदत असतात. गोदावरीच्या काना कोपऱ्यात सर्वाचे वास्तव्य गावांत सुसज्य धार्मिकस्थळे, गावाभोवती निसर्गमय वातावरण, पशु पक्षांचा गोड आवाज सकाळी व संध्याकाळी किलबिलाट व चिवचिवाट, गोदावरीच्या पात्रात वास्तव्यास असलेले बाहेर राज्यातील रंगींबेरंगी पक्षी जणू काही पक्ष्यांचे बरबडा नगरीच माहेर घरच असाव गावाच्या पूर्व दिशेला हिरवेगार बाभूळबण त्या बाभाळीच्या हिरव्यागार झाडावर शेकडो सुंदर बगळे
वास्तव्यास आलेले दिसतात सदरची बरबडा नगरी
विविध ढंगाने नाटलेली पाहावयास मिळत आहे.
© बरबड्याच्या निसर्गमय बाभूळ बनातील हिरव्यागार वेलीत..अन..रानात बगळ्यानी वाढविलेले सौंदर्य सृष्टी पाहून निसर्ग प्रेमी व पशुपक्ष्यांचा आकर्षक छंद जोपसणारे निसर्ग प्रेमी शिक्षक तिप्पलवाड एन.टी सर यांनी सुंदर असे बगळ्याचे टिपलेले चित्र पाहून दैनिक प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे, जिल्हा प्रतिनिधी गोवर्धन बियाणी व रुई येथील निर्भीड पत्रकार माधव पवार आणि त्यांची टीम वर्तमान पत्रातुन दिनांक २० सप्टेंबर २०२० रोजी प्रकाशित केले सदरच्या शिक्षकांना पक्ष्यांचे दृष्य दिसले व त्यांना हिरव्यागार सृष्ठीतील बगळ्याचा मोह आवरता आला नसल्यामुळे सदरील दृश्य घराच्या गच्चीवर जाऊन तिप्पलवाड एन टी सर यांनी टिपले होते अन रानात बगळ्यांनी वाढविले सृष्टीसौंदर्य या मथळ्याखाली बातमी प्रकाशित झाल्याच्या नंतर शिक्षकाला उत्तेजन व प्रेरणा मिळाली होती त्याबद्दल संपादक साहेब व टीम यांचे मनःपुर्वक आभार ही मानले होते. धरतीवरती स्वर्ग उतरला गोदामाये तिरी ! निसर्गाची उधळन झाली बरबडयावरी.
दिवंगत गोविंदराव धर्माधिकारी हे नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष होते, बिलोली पंचायत समितीचे सभापती झाले होते, जिल्हा परिषद नांदेडचे उपाध्यक्ष, शिक्षण सभापती सुद्धा होते म्हणून त्यांना नावा रूपाने रावाच बरबडा गाव असे म्हणतात बरबडा गावाची लाल मिरची अख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असल्यामुळे लाल मिरचीच गाव म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे.नंतर सरपंच म्हणून दिवंगत मारोतराव संभाजीराव पाटील पचलिंग यांनी सुद्धा गावचा मोठ्या प्रमाणात विकास केला त्यानंतर दिवंगत बळवंतराव नरहरराव धर्माधिकारी सरपंच होते त्यांनी सुद्धा गावाचा विकास भरपूर केलेला होता म्हणून चांगल्या विचाराचे सरपंच म्हणून त्यांची ओळख होती.
त्यांच्या नंतर बाळासाहेब नरहरराव धर्माधिकरी यांनी बरबडा गावाचा दर्जेदार विकास केला आहे.
त्यानंतर बरबडा गावाच्या पहिल्या महिला सरपंच म्हणून शाहूबाई गोविंदराव जेट्टेवाड, ह्या गावच्या पहिल्या सरपंच म्हणून गावांत मोठा बहुमान मिळाला होता त्या नंतर व्यंकटराव तुकाराम सूरेवाड यांनी सुद्धा गावचे सरपंचपद भूषविले होते नंतर सरपंच म्हणून बालाजी मोहनराव मदेवाड यांनी सुद्धा गावाचा विकास केला होता त्यानंतरचे सरपंच कै. साईनाथ गंगाराम आईनवाड यांनी बरबडा गावचा चांगल्या प्रकारे विकास करीत होते परंतु अचानक त्यांचा मृत्यू झाला म्हणून त्यांच्या नंतर प्रभारी सरपंच भास्करराव मोहनराव धर्मधिकारी गावचे सरपंच म्हणून काम पाहिले आहे.बरबडा गावच्या महिला सरपंच श्रीमती लक्ष्मीबाई साईनाथ आईनवाड त्यांच्या काळात सुद्धा विकास झाला त्यानंतरचे सरपंच नागनाथ केरबा हांनमते यांनी सुद्धा त्यांच्या कार्यकाळात मोठया प्रमाणात विकास केला.दुसऱ्यांदा सरपंच म्हणून बालाजी मोहनराव मदेवाड यांना विकास करण्याची त्यांना संधी मिळाली. सध्या बरबडा गावचे नूतन सरपंच माधवराव केरबा कोलगाणे यांच्यावर गावाची जबाबदारी समस्त गावकऱ्यांनी दिली असल्यामुळे त्यांची गावाच्या विकासाच्या दिशेने वाटचाल चालू आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *