सोलापूर प्रतिनिधी (मयूरी उबाळे) : सांगोला तालुक्यातील नवजीवन प्रभावळ संघ, जवळा अंतर्गत धनलक्ष्मी मोरिंगा पावडर उत्पादक समूह मांजरी च्या मोरिंगा पावडर उत्पादनाला दक्षिण कोरिया तून मागणी आली असून सदरची मागणी धनलक्ष्मी मोरिंगा पावडर उत्पादक समूहाच्या अध्यक्षा सौ. सारिका दत्तात्रय घाडगे व इतर सदस्य यांच्या माध्यमातून पुरवठा करण्यात आली.
सदरची मोरिंगा पावडर ही कोरोना काळात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरली आहे. मानवी शरीरासाठी बहुदा आजारावर ही मोरिंगा पावडर उपयुक्त ठरते. त्यामुळे या पावडर ची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असून ही पावडर ग्रामीण भागातील उमेद अभियानातील समूह गटातील महिलांनी तयार केली व त्याची मागणी परदेशातील होऊ लागली त्यामुळे संपूर्ण तालुक्यातून बचत गटातील महिलांचे अभिनंदन केले जात आहे..
Leave a Reply